पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी (४ एप्रिल) एकाच मंचावर एकत्र आले. मोदी सध्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात गुंतले आहेत. दरम्यान, आज त्यांनी बिहारच्या जमुई येथे एका जनसभेला संबोधित केलं. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारदेखील त्यांच्याबरोबर होते. नितीश कुमार यांनीदेखील या सभेत भाषण केलं. नितीश कुमार यांनी जमुईमधील सभेत केलेल्या भाषणात राष्ट्रीय जनता दलाबरोबरची आघाडी तोडून भाजपाबरोबर युती करण्याच्या निर्णयावर सविस्तर भाष्य केलं. नितीश कुमार म्हणाले, “आम्ही खोटी-खोटी आघाडी केली होती. परंतु, जेव्हा आम्हाला समजलं की, तिकडे गडबड सुरू झाली आहे, त्यानंतर आम्ही लगेच वेगळे झालो.” त्यानंतर नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून म्हणाले, आता आम्ही कायमचे एक झालो आहोत.

नितीश कुमार पंतप्रधान मोदींकडे पाहून म्हणाले, आम्ही मध्येच खोटं-खोटं त्यांच्याबरोबर (राजद) गेलो होतो. तिकडे गेल्यावर काही महिन्यांनी आमच्या लक्षात आलं की, तिकडे गडबड सुरू झाली आहे. मग आम्ही परतण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही (संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पार्टी) कायमचे एकत्र आलो आहोत. आता आम्ही इकडे-तिकडे फिरकणार नाही, कुठेही जाणार नाही.

Ashok Gehlot, pm narendra modi,
पंतप्रधान मोदींच्या नावावर भाजपला स्पष्ट बहुमत नाही, आता मोदींनी…; अशोक गहलोत यांची जोरदार टीका
Manmohan Singh
मुस्लिमांचा संपत्तीवर पहिला अधिकार? मोदींच्या आरोपावर मनमोहन सिंगांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Narendra Modi
“थंड चहा दिला म्हणून कानाखाली मारायचे, लहानपणापासूनच अपमान-शिवीगाळ नशिबात…”, मोदींनी सांगितली करुण कहाणी
Narendra Modi
मोदींचा नवीन पटनायक यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, “बीजेडीने लुटलेले पैसे कुठंही ठेवले तरी एक एक…”
narendra modi
वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन; म्हणाले, “त्याग, शौर्य आणि अन्…”
Rahul gandhi slams pm modi in karnataka rally
“मी मनुष्यपोटी जन्मलो नाही”, पंतप्रधान मोदींच्या त्या दाव्यावर राहुल गांधींची टीका; म्हणाले, “देवा असा कसा…”
What Sharad Pawar Said About Narendra Modi?
शरद पवारांचं वक्तव्य, “पंतप्रधान नरेंद्र मोदी मला भटकती आत्मा म्हणाले कारण ते..”
Lok Sabha election of 1989 Rajiv Gandhi V P Singh Chandra Shekhar
राजीव गांधींचे अर्थमंत्री व्ही. पी. सिंह त्यांना शह देऊन पंतप्रधान कसे झाले?

नितीश कुमार यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. तसेच केंद्रातल्या मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. नितीश कुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी केंद्रात १० वर्षांपासून आहेत. ते किती कामं करत आहेत. बिहारसाठीदेखील ते खूप कामं करत आहेत. बिहारच्या विकासासाठी कामं करून घेत आहेत. रस्ते, पूल उभारण्यापासून वेगवेगळी विकासकामं चालू आहेत. केंद्र सरकार सर्व गरजेच्या गोष्टी करत आहे.

हे ही वाचा >> “संदेशखाली प्रकरणातील गुन्हेगारांना संपूर्ण आयुष्य…”, पंतप्रधान मोदींचा इशारा; प. बंगालमधील सभेतून TMC वर टीका करत म्हणाले…

बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणं व्हायची. आम्ही सत्तेत आल्यावर ते बंद झालं. मी आज या व्यासपीठावरून मुस्लीम समुदायाला एवढंच सांगेन की, एक गोष्ट विसरू नका, आम्ही सत्तेत आहोत तोवर धर्माच्या नावाखाली भांडणं होणार नाहीत. परंतु, तुम्ही चुकून जरी तुम्ही त्यांना (राजद, काँग्रेस) मत दिलंत तर ते हिंदू आणि मुसलमानांमध्ये भांडणं लावतील.