पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील ताबारेषेवर (एलओसी) शनिवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी ही संयुक्त कारवाई केली. बारामुल्लाच्या उरी भागात ताबारेषेजवळ शनिवारी सकाळी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला, असा संदेश लष्कराच्या ‘चिनार कॉर्प्स’ने ‘एक्स’वर प्रसारित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरी भागातील हातलंगा सीमा भागात शनिवारी ही कारवाई करण्यात आली. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र, सीमेजवळील पाकिस्तानी चौकीतून सतत गोळीबार चालू असल्यामुळे तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेताना अडचणी येत आहेत. मृत दहशतवादी आणि त्यांच्या संघटनेची ओळख अद्याप समजू शकली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three terrorists killed in an encounter in kashmir ysh