two Brothers rape 15 year old try to bury her Crime News : दोन भावांनी एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर आरोपींनी पीडिता ५ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर तीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार देखील ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यात घडला आहे.
पोलिसांनी बनशबारा गावातील भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन भावांना अटक केली आहे, तर तिसरा संशयित, टुलू अद्याप फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अल्पवयीन पीडितेवर अनेक वेळा अत्याचार केला. जेव्हा ती गर्भवती असल्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गुन्हा लपवण्यासाठी चक्क तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पीडितेला घटनास्थळी बोलवले आणि ती आली देखील. तिथे पोहचल्यावर तिला जमिनीत मोठा खड्डा खणलेला आढळून आला. त्यानंतर ते दोघे तिला धमकावू लागले, की जर तिने गर्भपात करून घेतला नाहीत तर ते तिला खड्ड्यात जिवंत गाडतील.
दरम्यान, पीडित मुलगी आरोपींपासून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिने तिच्या वडिलांना घडलेला प्रसंग सांगितला. जिल्हा मुख्यालय रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि कुजांग पोलिस ठाण्यात तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर दोन्ही संशयित आरोपींनी अटक करून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले, आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
जगजितसिंगपूर येथे या आठवड्यात झालेली ही दुसरी लैंगिक अत्याचाराची घटना आहे. गुरूवारी दुसऱ्या एका घटनेत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. ही पीडिता एका वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परत येत होती.
रविवारी अशीत एक खटना मलकानगिरी जिल्ह्यात देखील समोर आली. येथे एक अल्पवयीन मुलीचे तीन आरोपींनी अपहारण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती पीडिता त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यात यशस्वी झाली, पण ती घराकडे जात असताना भेटलेल्या ट्रक चालकानेदेखील तिच्यावर बलात्कार केला.
गेल्या महिनाभरात राज्यात किमान १२ बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. या वर्षी फक्त जून महिन्यात पाच बलात्कार, एक सामूहिक बलात्काराची घटना नोंदवली गेली आहे, आणि हे अवघ्या १० दिवसांच्या काळात घडले आहे.
जुलै महिन्यात बालासोर येथील फकिर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमधील एक २० वर्षीय विद्यार्थीनीने स्वतःला पेटवून घेतल्याने तिचा मृत्यू झाला, शिक्षकाविरोधातील लैंगिक छळाची तक्रार नाकारल्याने या तरुणीने हे पाऊल उचलले होते.