Indian Immigrants Deported from US : अमेरिकेच्या लष्करी विमानातून दुसऱ्या खेपेत ११९ बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात पाठवण्यात आले आहे. शनिवारी या स्थलांतरितांना घेऊन विमान पंजाबच्या अमृतसर येते उतरले.मात्र या २१९ जणांपैकी दोघांना अमृतसर विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली आहे. पण याचे कारण काय? या दोघांना पंजाबच्या पटियाला येथील एखा गुन्ह्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हे दोघे गुन्हा करून अमेरिकेत पळून गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले संदीप आणि प्रदीप हे दोघे चुलत भाऊ आहेत आणि २०२३ मध्ये पटियाला जिल्ह्यातील राजपुरा शहरात दाखल झालेल्या एका खून प्रकरणात ते पोलिसांना हवे होते. शनिवारी अमृतसरच्या श्री गुरु रामदास विमानतळावर उतरताच पटियाला पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, हे दोन्ही आरोपी राजपुरा शहरातील रहिवासी आहेत आणि त्यांना या खून प्रकरणात आधीच फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. दोन्ही आरोपींविरोधात २६ जून २०२३ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०७, ३२३, ५०६, १४८ आणि १४९ या भारतीय न्याय संहिता कलमांच्या अधारावर पटियाला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. असे असले तरी दोन्ही आरोपींविरोधात ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रम्प प्रशासनाच्या बेकायदेशीर स्थलांतरावर कारवाई सुरू केली आहे . यादरम्यान ११९ भारतीय निर्वासितांच्या दुसरी तुकडी घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान शनिवारी रात्री उशिरा अमृतसरमध्ये दाखल झाले.

कोणत्या राज्यातील किती जण?

अमेरिकेतून भारतात परत पाठवण्यात आलेल्या स्थलांतरीतांमध्ये ६७ जण हे पंजाबचे आणि ३३ जण हे हरियाणामधील असल्याचे प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले. उरलेल्यांपैकी आठ जण गुजरात, तीन उत्तर प्रदेश, दोन गोवा आणि महाराष्ट्र, राजस्थान येथील प्रत्येकी दोन तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर येथील प्रत्येकी एक जण आहे. यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने पहिल्या विमानाने १०४ निर्वासितांना परत पाठवले होते. हे विमान देखील पंजाबच्या अमृतसर येथीव विमानतळावर उतरले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two cousins arrested in amritsar after being deported from us marathi news rak