एपी, बीजिंग : चीनमधील शून्य करोना धोरणाविरुद्ध मोठा जनक्षोभ उसळून अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने करोना विषाणूप्रतिबंधक निर्बंध आणखी कठोर केले आहेत. चीनमधील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 करोना निर्बंधांना विरोधाच्या निमित्ताने चीनमध्ये लोकांचा असंतोष बाहेर पडत आहे. गेल्या काही दशकांत इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोकांचा असंतोष दिसून आला नव्हता. परंतु, मोठय़ा प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आल्याने मंगळवारी बीजिंग, शांघाय तसेच अन्य प्रमुख शहरांत कुठेही निदर्शनांचे प्रकार दिसून आले नाहीत. अध्यक्ष जिनपिंग यांनी शिक्षण घेतलेल्या त्सिंघुआ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रविवारी निदर्शने केली होती. तेथे तसेच बीजिंगमधील अन्य शाळांत करोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पण गेल्या आठवडय़ातील निदर्शने लक्षात घेता विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठविल्याने करोना प्रसाराची जोखीम आणखी कमी होईल, असे विद्यापीठ- शाळांचे म्हणणे आहे. काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकांवर पोहोचविण्यासाठी बसची व्यवस्था केली असून परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Universities in china started sending students home to prevent spread of coronavirus zws
First published on: 30-11-2022 at 03:22 IST