Israel – Palestine News in Marathi: हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनंही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गाझा पट्टी आणि सीमाभागात चालू असणारं इस्रायल-हमास युद्ध चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्रायली भूमीवर सामान्य नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले जात असताना दुसरीकडे अस्रायलनं गाझा पट्टीत हल्ले करून हमासचा तळ उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. “आमच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही आवश्यक ते सगळं करू”, अशी ठाम भूमिका इस्रायलयनं घेतली असताना आता अमेरिकन युद्धनौका युद्धभूमीच्या दिशेनं सरकू लागल्या आहेत. त्यामुळे आता हे युद्ध निर्णायक वळणावर आल्याचं बोललं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर रॉकेट्स डागण्यात आले. इस्रायल सरकारच्या माहितीनुसार या रॉकेट्सची संख्या तब्बल साडेतीन हजारांहून जास्त आहे. या हल्ल्यात शेकडो इस्रायली नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यापाठेपाठ हमासचे दहशतवादी सीमाभागातून आत शिरले व त्यांनी इस्रायली नागरिकांचं हत्यासत्र सुरू केलं. असंख्य स्रियांना ओलीस ठेवलं. समुद्रमार्गेही हमासकडून हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापाठोपाठ इस्रायलनंही गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हल्ले सुरू केले आहेत.

जो बायडेन यांची पूर्ण मदत करण्याची तयारी!

एका अंदाजानुसार, या हल्ल्यात आत्तापर्यंत ६०० हून जास्त इस्रायली नागरिक मृत्यूमुखी पडले असून २००० हून जास्त जखमी झाले आहेत. परिस्थिती चिघळल्याचं पाहाता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला अतिरिक्त मदत देण्याची घोषणा केली आहे.

“हमासकडून इस्रायलवर करण्यात आलेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला अतिरिक्त मदत पाठवण्याचे आदेश दिले आहेत”, असं व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. जो बायडेन व कमला हॅरिस यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी इस्रायलमधील परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

Video: “हे आमचं ९/११..”, युद्ध चिघळलं; इस्रायलचं हवाई दल गाझा पट्टीत शिरलं!

इस्रायलची विनंती अमेरिकेनं स्वीकारली!

दरम्यान, रविवारी अमेरिकेचे संरक्षणविषयक सचिव अँटनी ब्लिंकन यांनी अमेरिका इस्रायलकडून आलेल्या अतिरिक्त लष्करी मदतीसाठीच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करत असल्याचं म्हटलं होतं. त्यापाठोपाठ आता अमेरिकेच्या युद्धनौका इस्रायलच्या किनाऱ्याच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकीकडे इस्रायली लष्कर, हवाई दलाकडून गाझा पट्टीत तुफान बॉम्बफेक केली जात असताना दुसरीकडे भूमध्य सागरातून अमेरिकेच्या युद्धनौका गाझा पट्टीवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us warships moving towards israel against hamas attack targeting gaza strip pmw