Video : “तुम्ही ज्या रूग्णालयाचे उद्घाटन करत आहात, त्याचे उद्घाटन आम्ही आधीच केलंय” ; मोदींसमोरच ममता बॅनर्जींचं विधान

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आमनेसामने?

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. आहे मात्र यावेळी ते प्रत्यक्ष नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे समोरासमोर आले होते. निमित्त होते ते, पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या कॅम्पसचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटनाचे.

या ऑनलाईन कार्यक्रमास मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची देखील उपस्थिती होती. या प्रसंगी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींसमोर म्हणाल्या की, “आरोग्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दोनदा फोन केला होता. मला वाटले हा कोलकात्यातील कार्यक्रम आहे, पीएम मोदी स्वत: यामध्ये रस दाखवत आहेत. माहिती मी हे सांगू इच्छिते की, याचं उद्घाटन आम्ही अगोदरच केलं आहे. कसं केलं? करोना काळात आम्हाला केंद्रांची गरज होती. तेव्हा मी स्वत: एक दिवस तिकडे गेली असताना, चित्तरंजन रुग्णालय मी पाहिले की, हे राज्य सरकारशी जोडलेले आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्याचे उद्घाटन करून त्याचे करोना सेंटर बनवले. ”

तसेच, ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “राज्य सरकार कर्करोग रुग्णालयासाठी २५ टक्के बजेट देत आहे. या रुग्णालयासाठी राज्य सरकारने ११ एकर जागा दिली आहे. त्यामुळे लोकांचा विचार करता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे काम केले पाहिजे. ”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video we have already inaugurated the hospital you are inaugurating mamata banerjees statement in front of modi msr

Next Story
“कुणीही आत्मसंतुष्ट होऊ नका, पुढच्या दोन आठवड्यात…”, करोनाबाबत दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांचा गंभीर इशारा!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी