Assembly Election Results 2023 on ECI website : देशभरात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणासह मिझोरम या पाच राज्यांच्या निकालाविषयी कमालीची उत्सुकता आहे. एग्झिट पोल्समध्ये (मतदानोत्तर चाचण्यांमध्ये) काँग्रेसला छत्तीसगड आणि तेलंगाणात सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तवला आह़े. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत येईल, असा अंदाज आहे. मिझोराममध्ये सर्व एग्झिट पोल्सने त्रिशंकु स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. अशातच आता रविवारी (३ डिसेंबर) यातील ४ राज्यांचा आणि सोमवारी (४ डिसेंबर) मिझोरामचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुकता असणाऱ्या हे निकाल अधिकृतपणे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. ते नेमके कसं पहायचे, तेथे कोणते तपशील पहायला मिळतील अशा प्रश्नांच्या उत्तरांचा हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणासह मिझोरम या पाचही राज्यांचे तपशीलवार निकाल निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट https://results.eci.gov.in/ येथे सर्वांना पाहता येणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून हे निकाल समोर यायला सुरुवात होईल. मोबाईल अॅपवर हे निकाल पाहण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘वोटर हेल्पलाईन’ (Voter Helpline App) नावाचं अॅपही डाऊनलोड करता येऊ शकतं.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्याच्या पायऱ्या खालीलप्रमाणे…

१. केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट https://results.eci.gov.in/ येथे भेट द्या.

२. तुम्हाला मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड अशा चार राज्यांच्या निकालाचे टॅब दिसतील. त्यातील राज्य निवडा.

३. तुम्हाला येथे पक्षनिहाय निकाल, मतदारसंघनिहाय सर्व उमेदवार आणि मतदारसंघातील निकालाचा कल असे तीन पर्याय दिसतील. त्यापैकी एक पर्याय निवडा.

४. या ठिकाणी तुम्ही त्या क्षणापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आधारे समोर आलेला निकालाचा कल किंवा निकाल पाहू शकता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When where and how to check election results online on eci website pbs