भारतीय निवडणूक आयोगाने राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Assembly Elections Dates 2023) जाहीर केल्या आहेत. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि काँग्रेससह इतर मुख्य विरोधी पक्षांसाठी एक प्रकारची सेमीफायनलच असणार आहे.
मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतले जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान -२३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.
मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान -२३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतलं जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. Read More
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. शेतकऱ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना, खते, धान्य, आदींची वाहतूक करताना तारेवरची…
२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे नवं समीकरण महाविकास आघाडीच्या रुपात महाराष्ट्रात पाहायला मिळालं. मात्र…
चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. यामुळे वाहननिर्मिती उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या चाकण एमआयडीसीतील सुमारे ५० कंपन्या गुजरात,…