बिहारच्या गया जिल्ह्यात जनता दल युनायटेडच्या (जदयू) पक्षाच्या महिला आमदाराच्या मुलाने त्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून एका तरूणाची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार घडला.
आदित्य सचदेव हा युवक शनिवारी रात्री आपल्या मित्रांसह कारमधून जात होता. त्यावेळी आदित्यने आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी याच्या एसयूव्हीला ओव्हरटेक केले. आदित्यच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही गाडीला ओव्हरटेक करण्याच प्रयत्न करत असताना पुढील गाडीतील लोकांनी हवेत गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यांच्यापैकी एकाने कमांडोचा गणवेश परिधान केला होता. त्यापैकी एक गोळी आदित्यला लागली आणि त्याचा मृत्यू झाला.
देवी या बिहार विधानसभेत सदस्य आहेत. त्यांचे पती बिंदी यादव हे बाहुबली नेता म्हणून प्रसिद्ध आहेत. देवी यांचा मुलगा रॉकी हा फरार आहे. पोलिसांनी बिंदी यादव व त्यांचा सुरक्षारक्षक राजेश कुमार यांना अटक केली आहे. मात्र, बिंदी यादव यांच्या दाव्यानुसार आदित्य सचदेव आणि त्याच्या मित्रांनी मद्यपान केले होते. त्यांनी माझ्या मुलाच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी माझ्या मुलाची गाडी थांबविली आणि त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हा माझ्या मुलाने स्वसंरक्षणार्थ त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तूलमधून चुकून गोळी झाडली, असे बिंदी यादव यांनी म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2016 रोजी प्रकाशित
गाडीला ओव्हरटेक केल्याने नेत्याच्या मुलाने केली तरूणाची हत्या
माझ्या मुलाने स्वसंरक्षणार्थ त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तूलमधून चुकून गोळी झाडली.
Written by एक्स्प्रेस वृत्तसेवा
Updated:

First published on: 08-05-2016 at 12:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth shot dead in gaya for allegedly overtaking jdu mlc son car in bihar