X

Happy New Year 2021 : नववर्षात कधी आहे दसरा, दिवाळी?; जाणून घ्या सार्वजनिक सुट्ट्या

2021 मध्ये महत्त्वाचे सण कोणत्या दिवशी, किती सुट्ट्या, किती लाँग विकेन्ड?

Maharashtra Public Holiday 2021 List : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाचं आर्धे वर्ष घरात बसूनच गेलं आहे. कदाचीत ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठीही सरकार गाइडलाइन जारी करु शकतं.. २०२० वर्षाला लवकर आपण निरोप देऊ आणि २०२१ वर्षाचं स्वगात करु. नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. यानिमित्ताने अनेकांनी नववर्षाचे कँलेडर चाळायला सुरुवात केली आहे. त्यात कोणती सुट्टी रविवारी आहे, कोणती सुट्टी शुक्रवारी आली आहे ज्यामुळे लाँग विकेन्डचे प्लॅन करता येतील याचेही जोरदार प्लँनिग अनेकांनी सुरु केलं असेल.

येत्या वर्षाची सुरुवात शुक्रवारने होणार आहे. त्यानंतर वर्षातील पहिली शासकीय सुट्टी २६ जानेवारीला मिळणार आहे. तर पहिला लाँग विकेन्ड १९ फेब्रुवारी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून नुकतीच वर्ष २०२१ मधील सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी जाहीर झाली आहे. येत्या वर्षात कोणते सण कोणत्या तारखेला आले आहेत. तुम्हाला कधी लाँग विकेन्डची संधी मिळू शकते. त्यानुसार तुम्ही सुट्टीचा प्लॅन करु शकता.

 

तारीख दिवस सुट्टी
२६ जानेवारी मंगळवार प्रजासत्ताक दिन
१९ फेब्रुवारी शुक्रवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती
११ मार्च गुरुवार महाश‍िवरात्र‍ी
२९ मार्च (दुसरा दिवस) सोमवार होळी
२ एप्रिल शुक्रवार गुड फ्रायडे
१३ एप्रिल मंगळवार गुढीपाडवा
१४ एप्रिल बुधवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
२१ एप्रिल बुधवार रामनवमी
१३ मे गुरुवार रमझान ईद
२६ मे बुधवार बुद्ध पोर्णिमा
२१ जुलै बुधवार बकरी ईद
१६ ऑगस्ट सोमवार पारशी नववर्ष
१९ ऑगस्ट गुरुवार मोहरम
१० सप्टेंबर शुक्रवार गणेश चतुर्थी
१५ ऑक्टोबर शुक्रवार दसरा
१९ ऑक्टोबर मंगळवार ईद ए मिलाद
४ नोव्हेंबर गुरुवार दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन)
५ नोव्हेंबर शुक्रवार दिवाळी (बलिप्रतिपदा)
१९नोव्हेंबर शुक्रवार  गुरुनानक जयंती

 

शनिवार आणि रविवारी येणाऱ्या सुट्ट्या

२५ एप्रिल रविवार  महावीर जंयती
१ मे शनिवार  महाराष्ट्र दिन
१५ ऑगस्ट रविवार  स्वातंत्र्य दिन
२ ऑक्टोबर शनिवार  महात्मा गांधी जयंती
२५ डिसेंबर शनिवार  ख्रिसमस

 

23
READ IN APP
X