शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमधून नवउद्योजक अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) घराघरात परिचित झाला. दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर ग्रोवरची कमतरता अनेकांना भासत आहे. तसेच Doglapan या पुस्तकामुळे अशनीर लोकप्रिय झाला. Doglapan या शब्दावरुन त्याचे अनेक मीम्सही अधून मधून व्हायरल होत असतात. इतरांना भांडवल उपलब्ध करुन देणाऱ्या अशनीरचा पगार किती होता माहितीये का? नुकत्याच भारत पे (BharatPe) या कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगच्या माध्यमातून अशनीरच्या पगाराबाबत माहिती उघड झाली आहे. मनीकंट्रोल या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. BharatPe चा सहसंस्थापक असलेल्या अशनीर ग्रोवरला २०२२ साली पगाराच्या स्वरुपात १.६९ कोटी देण्यात आले आहेत. त्याची पत्नी आणि या कंपनीची माजी कर्मचारी माधुरी जैन ग्रोवरलाही गल्लेलठ्ठ पगार होता. माधुरी यांना पगाराच्या स्वरुपात ६३ लाख रुपये देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशीनर पेक्षाही सीईओंना जास्त पगार

BharatPe कंपनीने सांगितले की, माजी सीईओ सुहैल समीर यांना आर्थिक वर्ष २०२२ साठी २.१ कोटींचा पगार दिलेला आहे. कंपनीचे चेअरमन आणि एसबीआयचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांना पगाराच्या स्वरुपात २१.४ लाख रुपये देण्यात आले आहेत. सीईओ सुहैल समीर यांनी याच वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी कंपनीचे इतर अधिकारी, संचालक, सहसंस्थापक यांना २९.८ लाखांचे वितरण मानधनाच्या स्वरुपात झालेले आहे. तर BharatPeचे बोर्ड सदस्य केवल हांडा यांना ३६ लाख रुपये पगार देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatpe filings reveal salaries of ashneer grover his wife madhuri ceo suhail and rajnish kvg
First published on: 28-01-2023 at 12:36 IST