२१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. मात्र याच दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या दिवशी सुरु होणारं दक्षिणायन. उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन स्थिती आहेत. सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस दक्षिणेकडे झुकण्याच्या क्रियेला दक्षिणायन असं म्हटलं जातं. दक्षिणायनात पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात सूर्याचा प्रवेश दर्शवतं. त्यामुळे या क्रियेला दक्षिणायन असं संबोधलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. मात्र पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष हा सरळ नसून २३.५ अंशात कललेला आहे. पृथ्वी २३.५ अंशात एका बाजूला कललेली आहे आणि त्याच स्थितीत ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी पृथ्वीचा उत्तर ध्रुवाचा भाग आणि दक्षिण ध्रुवाचा भाग सूर्याच्या जवळ येतो. त्यामुळे दर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य आणि पृथ्वीचे अंतर सारखेच असते.

पृथ्वीची उत्तर ध्रुवाजवळची बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. २१ मार्च ते २१ जून या कालावधीत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच उत्तरायण असं म्हटलं जातं. तर २१ जूनला दक्षिणायन सुरु होतंय. २२ सप्टेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत सूर्य पूर्णतः दक्षिण दिशेला सरकतो या कालावधीला दक्षिणायन असं म्हणतात. २२ डिसेंबरनंतर उत्तरायण सुरु होण्याची प्रक्रिया सुरु होते. १४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं.

उत्तरायण आणि दक्षिणायन यांचा कालावधी सहा महिने असतो. २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. दक्षिणायन सुरु झाल्यानंतर दिवस छोटा होऊ लागतो तर रात्र मोठी होऊ लागते. तर उत्तरायण सुरु झाल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते. दक्षिणायन लागल्यानंतर आषाढी एकादशी येते. या एकादशीलाच देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. या काळात मुंज, लग्न अशी शुभ कार्य केली जात नाहीत. मात्र विविध व्रत वैकल्यं, उपास, तीर्थयात्रा आणि दान धर्म केले जातात अशी श्रद्धा आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know what is dakshinayan scj