दररोज वर्तमानपत्र वाचताय? मग तुम्हाला यामधील 'हे' गुपित माहितच हवयं | Do you know What Is The Meaning Of Four Colour Dots In The Newspaper | Loksatta

दररोज वर्तमानपत्र वाचताय? मग तुम्हाला यामधील ‘हे’ गुपित माहितच हवयं…!

Four Colour Dots In The Newspaper Meaning: वर्तमानपत्रातील ‘ही’ खास रंजक गोष्ट जाणून घ्या

Four Colour Dots In The Newspaper
वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांती माहिती (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Four Colour Dots In The Newspaper Meaning: जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणतीही घटना घडल्यास दुसर्‍या दिवशी ही बातमी आपल्याकडे वृत्तपत्रांमुळे येते. देशात काय घडामोडी चालल्या आहेत, ह्याची घरबसल्या माहिती नागरिकांना वृत्तपत्रांमुळे मिळते. देशभरात लाखो लोक दररोज वृत्तपत्र वाचतात, पण तुमच्या कधी हे लक्षात आलं आहे का की, वृत्तपत्राच्या तळाशी वेगवेगळ्या रंगाचे डॉट का असतात? अनेकवेळा हा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेऊया.

वर्तमानपत्रातील डॉटचे महत्व काय?

वर्तमानपत्र वाचताना आपल्याला वर्तमानपत्राच्या खाली चार रंगांचे डॉट पाहायला मिळतात. वर्तमानपत्रावरील हे चार रंगीत डॉट प्रिंटिंगशी निगडीत असतात. हे चार रंगीत डॉट आपल्याला वर्तमानपत्र कुठल्या प्रिंटिंगमधून छापल गेलं आहे, हे सांगतात. ही एक विशेष प्रकारची प्रिंटिंग असते ज्याला CMYK प्रिंटिंग असे म्हटले जाते. CMYK ला रजिस्ट्रेशन मार्क देखील म्हटलं जातं. या प्रिंटिंगमध्ये चार रंग असतात. चला तर जाणून घेऊया हे कोणते रंंग असतात.

(हे ही वाचा : तुमच्याही गाडीची Series Number Plate ‘ही’ आहे काय? मग हा नियम जाणून घ्या, अन्यथा… )

C म्हणजे – सीयान निळा
M म्हणजे मजेंटा
गुलाबी
Y म्हणजे येलो  
पिवळा
K म्हणजे ब्लॅक काळा

वर्तमानपत्राच्या तळाशी हे चार डॉट का छापलेले असतात?

कुठलेही चित्र जर का वर्तमानपत्रात छापायंच असेल तर ह्या रंगाच्या प्लेट्स एक एक करून एका पानावर ठेवल्या जातात आणि मग हे चित्र वर्तमानपत्रावर छापलं जातं. जर का छपाईच्या वेळेला चित्र फिकट छापली जात असतील तर ह्याचा अर्थ या चारी रंगाच्या प्लेट्स बरोबर लागल्या गेल्या नाही आहेत, म्हणूनच CMYK च्या प्रिंटिंग ला Registration Marks or Printers Marker असं देखील म्हटलं जातं.

(हे ही वाचा : SUV, XUV, MUV आणि TUV कोणती आहे सर्वाेत्तम? कार खरेदीपूर्वी हा फरक जाणून घ्या )

सांगायचं म्हणजे, वर्तमानपत्रातील हे चार डॉट वर्तमानपत्रांची छपाई व्यवस्थित झाली की नाही, हे तपासण्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात. यामुळेच वर्तमानपत्रात छापल्या जाणाऱ्या बातम्या आणि फोटो वेगवेगळया रंगात बरोबर छापल्या गेल्या की नाही हे सुद्धा कळते. या रंगामध्ये थोडीही गडबड झाली तर समजून जायचं की वर्तमानपत्राच्या छपाईमध्ये सुद्धा गडबड झालेली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे, वृत्तपत्रावरील हे चार डॉट वृत्तपत्रावर योग्य कलर पॅटर्न बनवण्यासाठी डॉट मार्कर म्हणून काम करतात.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 09:29 IST
Next Story
विश्लेषण: पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? हा पुरस्कार नाकारणारे चार भारतीय कोण होते?