आजकाल कपड्यांसोबतच सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारचे शूज आणि चप्पल घालण्याचा ट्रेंड आहे. त्याचबरोबर लोक स्टायलिश आणि रंगीबेरंगी पादत्राणे खरेदी करण्यावर भर देतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या चपला बाजारात उपलब्ध असतात. पायांचे रक्षण करण्यासाठी आपण चपलांचा वापर करतो. आपल्यापैकी अनेक जण दररोज घरात किंवा बाहेर जाताना स्लीपर किंवा चप्पल घालतो. ही चप्पल श्रीमंतांतल्या श्रीमंत आणि गरिबांतल्या गरीब माणसाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण, या स्लीपरला ‘हवाई चप्पल’ का म्हणतात? तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, जर ‘हवाई चप्पल’ घातल्यानंतर माणूस नक्कीच हवेत उडू लागत नाही, तरीही या चपलांचे नाव ‘हवाई चप्पल’ असे का ठेवले गेले? त्याविषयी आज आपण जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्लीपरला हवाई चप्पल का म्हणतात?

अनेकांना असे वाटते की, ही स्लीपर घातल्याने पायांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. त्यामुळे या चपलेला ‘हवाई चप्पल’ असे नाव पडले असेल; पण असे अजिबात नाही. वास्तविक हवाई चप्पल हे नाव त्याच्या निर्मिती किंवा उत्पत्तीशी संबंधित आहे. इतिहासकारांच्या मते, अमेरिकेत ‘हवाई आयलँड’ नावाचं बेट आहे. या बेटावर एक वैशिष्ट्यपूर्ण असा वृक्ष आढळतो. हा वृक्ष ‘टी’ नावाने ओळखला जातो. या झाडापासून एक विशेष रबरासारखे फॅब्रिक तयार केले जाते. हे फॅब्रिक अतिशय लवचिक असते. या फॅब्रिकपासून चप्पल तयार केली जाते. त्यामुळे त्यास ‘हवाई चप्पल’, असे म्हणतात. इतिहासकारांनुसार, हवाई चप्पल ही अमेरिकेतील हवाई आयलॅंडमुळे मिळाली.

(हे ही वाचा : खोदकाम करणाऱ्या JCB मशीनचा रंग पिवळाच का असतो? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण…)

तथापि, या प्रकरणात आणखी एक तर्कदेखील केला जातो की, जपानमध्ये चपलांचा वापर फार पूर्वीपासून होत होता. या चप्पलांना ‘जोरी’ असे म्हटले जाते. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा जपानी मजूर अमेरिकेच्या या बेटावर काम करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी एक वेगळ्या प्रकारची रबरी चप्पल घातली होती; जी पाहून हवाई येथील काही कंपन्यांनी अशाच प्रकारच्या चपला बनविण्यास सुरुवात केली होती. म्हणून चप्पल आणि हवाई आयलँड यांचा संदर्भ जोडला जात आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांनी ‘हवाई चप्पल’ वापरली होती. त्यानंतर जगभरात या नावाने ती प्रसिद्ध झाली.

असे म्हटले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा चप्पल संपूर्ण जगात पोहोचली तेव्हा त्याचे श्रेय ब्राझीलच्या शू-ब्रँड कंपनी ‘हवाईनाज’ला देण्यात आले. त्यानंतर १९६२ मध्ये हवाईनाज कंपनीने प्रथम पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या निळ्या स्ट्रीप चपला बनवल्या आणि तेव्हापासून हवाईयन चप्पल जगभरात निळी-पांढरी चप्पल म्हणून लोकप्रिय झाली. हीच चप्पल आजही प्रत्येक घरात पाहायला मिळते. चपलांच्या इतिहासाविषयी बोलायचे झाले, तर हवाई चपलेचा इतिहास खूप जुना आहे. अनेक देशांमधून प्रवास करीत ही चप्पल भारतात दाखल झाली. भारतात ही चप्पल आणण्याचे श्रेय बाटा (Bata) या कंपनीला जाते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know why is chappal called hawai chappal know the reason behind it pdb