Premium

‘गौडबंगाल’ हा शब्द मराठी भाषेला कसा मिळाला? काय आहे नेमका अर्थ?

काहीतरी गौडबंगाल आहे असं आपण अनेकदा वाचतो, म्हणतो. हा शब्द कुठून मराठी भाषेत आला माहीत आहे का?

What is the Meaning Of Marathi Word GaudBangal?
गौडबंगाल शब्द आणि बंगाल यांचा काही संबंध आहे का? (फोटो-अमेय येलमकर, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)

काहीतरी गौडबंगाल आहे असं वाक्य अनेकदा आपल्या कानांवर पडतं. गौडबंगाल हा शब्द आपल्याला बऱ्याच काळापासून परिचित आहे. बातम्यांमध्येही हा शब्द आपण अनेकदा वाचला आहे. कथांमधून, लेखांमधून या शब्दाचा परिचय आपल्याला झाला आहे. गौडबंगाल या शब्दाचा अर्थ काय आपण समजून घेऊ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौडबंगाल म्हणजे काय?

एक काळ असा होता की आपला देश हा जादूटोण्याचा देश म्हणून ओळखला जात असे. मध्यबंगाल ते ओरिसा हा प्रांत गौड प्रांत म्हणून ओळखला जात होता. कारण हा संपूर्ण प्रांत काळ्या जादूसाठी ओळखला जात असे. जादू हा शब्द उच्चारला की अनेकांना आजही बंगाली जादू आठवते. त्यावेळी देशात कुठेही वेगळी किंवा गूढ घटना घडली तर ती गौड किंवा बंगाली लोकांनीच केलेली करामत असावी असा समज अनेकदा व्हायचा. त्यावरुन अद्भुत, चमत्कारीक गूढ घटनेमागे गौडबंगाल आहे असं म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळेच हा शब्द अस्तित्वात आला गौडबंगाल. आजही तो वापरला जातोच हे विशेष.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How did the marathi language get the word gaudbangal what exactly does that mean scj

First published on: 07-12-2023 at 11:08 IST
Next Story
Money Mantra : स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप अन् मल्टी कॅप फंडांमध्ये फरक काय?