Heatwaves In India: एखाद्या ठिकाणी सलग तीन-चार दिवस तेथील कमाल तापमानाच्या तुलनेमध्ये वातावरणातील तापमान ३ ३ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असल्यास तेथे उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे असे म्हटले जाते. तसेच सलग दोन दिवस एखाद्या भागाचे तापमान ४५ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असेल तर तेव्हा तेथे उष्णतेची लाटेची समस्या निर्माण झाली आहे असे मानले जाते. भारतामध्ये दरवर्षी ५ ते ६ उष्णतेच्या लाटा येत असतात. हा त्रास प्रामुख्याने उत्तर भारतातील लोकांना सहन करावा लगातो. काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरामध्ये उन्हाची लाट आल्याचे जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उष्मा प्रतिबंधक कृतियोजना (Heat action plan) म्हणजे काय?

उष्णतेच्या लाटामुळे किंवा उष्माघातामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता असते. असे घडू नये यासाठी सरकार उष्मा प्रतिबंधक कृतियोजना किंवा कृतिआराखडा (Heat action plan) तयार करत असते. देशातील जिल्हा, शहर यांच्यानुसार उष्मा प्रतिबंधक कृतियोजना तयार करण्यात येते. या अंतर्गत हवामान खात्याद्वारे एका यंत्रणेची निर्मिती केली जाते. त्यामध्ये स्थानिक संस्थांची मदत घेतली जाते. या यंत्रणेद्वारे जनतेला उन्हाच्या प्रभावाची आगाऊ कल्पना देण्याचा प्रयत्न केला जातो. ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी टेलिव्हिजन, वृत्तपत्रे, वाहिन्या, सोशल मीडिया अशा विविध मार्गांचा वापर केला जातो.

उष्मा प्रतिबंधक कृतियोजनेचे प्रमुख घटक कोणते आहेत?

उन्हाच्या प्रभावामुळे लोकांचे हाल होऊ नये यासाठी उष्मा प्रतिबंधक कृतियोजना राबवण्यात येते. या यंत्रणेअंतर्गत लोकांना उष्णतेच्या लाटेचा धोका किती हानिकारक आहे याबाबतची माहिती लोकांना देण्यात येते. याशिवाय अशा स्थितीमध्ये नागरिकांनी काय करावे आणि काय करणे टाळावे हेदेखील सांगितले जाते. उष्मा प्रतिबंधक कृतियोजेनेचे एकूण चार मुख्य घटक आहेत –
१. उष्णतेची लाट ही महत्त्वाची आपत्ती आहे हे मान्य करणे.
२. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्या समाजगटांना नुकसान होऊ शकते हे ओळखणे.
३. सार्वजनिक थंडाव्याच्या जागांची निर्मिती करणे.
४. विविध माध्यमातून जनतेला लाटेबद्दल सावधानतेचे इशारे देणे.

आणखी वाचा – आपणच होऊ आपली सावली! उन्हामुळे वाढलेल्या प्रत्येक त्रासावर डॉ. प्रदीप आवटे यांचे उत्तर जाणून घ्या

उष्णतेच्या लाटेचा त्रास होऊ नये म्हणून लोकांना सावधान करण्यासाठी कलर कोडींगचा वापर केला जातो. असे केल्याने माहिती लोकांपर्यंत पोहचवणे जास्त सोपे होते. त्यानुसार अलर्ट जाहीर करण्यासाठी चार मुख्य रंगांचा वापर केला जातो.

  • पांढरा रंग (White alert) – वातावरण नेहमीसारखे आहे. सामान्य दिवस
  • पिवळा रंग (Yellow alert) – उष्ण दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा थोडे जास्त तापमान)
  • केशरी रंग (Yellow alert) – उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट (कमाल तापमानापेक्षा ४ ते ५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमान)
  • लाल रंग (Yellow alert) – उष्णतेची जास्त स्वरुपातील लाट (कमाल तापमानापेक्षा ६ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान)
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How does the heat action plan help prevent heat waves what are colors used when announcing summer alerts know more yps