How to check waiting ticket status : जर तुम्ही नेहमी रेल्वे प्रवास करत असाल, तर वेटिंग तिकिटच्या कन्फर्मेशनबाबतची प्रक्रिया तुम्हाला माहिती असली पाहिजे. अनेकदा रेल्वे प्रवाशांना वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची आशा असते. पण त्यांना याबाबात अधिकृत माहिती नसते. जर तुम्ही रेल्वे प्रवासासाठी वेटिंग तिकिट काढलं असेल, तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या तिकिटाच्या कन्फर्मेशनबाबत माहिती मिळवू शकता. वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता किती आहे, यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकिटाच्या कन्फर्मेशनबाबत तुम्हाला अधिकृत माहिती मिळवता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय रेल्वे लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. पण देशात हजारो रेल्वेगाड्यांचा प्रवास होत असूनही अनेक वेळा कन्फर्म तिकिट मिळण्यात अडचणी निर्माण होतात. प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वेकडून अनेक ऑनलाईन सुविधा प्रदान केल्या जातात. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिज्म कॉरपोरेशन (IRCTC) ची बेवसाईट आणि अॅपवरून लोकांना तिकिट बुकिंगपासून ट्रेन अपडेट्सपर्यंत सुविधा दिल्या जातात. रेल्वच्या जास्तीत जास्त सुविधा ऑनलाईनच्या माध्यमातून दिल्या जातात. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनाही या सुविधांचा लाभ मिळतो. तुमच्या आधार कार्डला आयआरसीटीसी आयडीवर लिंक करुन एका महिन्यात २४ तिकिट बुक करण्याचा लाभ मिळू शकतो. रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन ट्रेन का रनिंग स्टेटसही तपासू शकता.

नक्की वाचा – चेन खेचल्यावर ट्रेन का थांबते? पोलिसांना चेन खेचणाऱ्या प्रवाशाबद्दल कसं कळतं? हे आहे त्यामागचं कारण

वेटिंग तिकिट कन्फर्म होणार की नाही?

वेटिंग ट्रेन तिकिट बुक करण्याचा अर्थ असा नाही की, वेटिंग तिकिट कन्फर्मच होईल. अशा परिस्थितीत तुम्ही याबाबत सहज माहिती मिळवू शकता की, तिकिटाची कन्फर्म होण्याची शक्यता किती आहे. वेटिंग तिकिटाच्या कन्फर्मेशनच्या शक्यतेबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त पीएनआर नंबरची आवश्यकता आहे.

वेटिंग तिकिट कन्फर्मेशनबाबत स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

१) सर्वात पहिले आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर भेट द्या.
२) तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
३) त्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यामध्ये पीएनआर नंबर टाका आणि गेट स्टेटसवर क्लिक करा.
४) त्यानंतर एक नवीन पॉप-अप विंडो ओपन होईल.
५) यामध्ये तुमचं तिकिट कन्फर्म होण्याबाबत माहिती मिळेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways waiting ticket confirmation know the step by step process of waiting ticket confirmation nss