मागील महिन्यात प्रधानमंत्री सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलाय. देशात एकूण 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 19 हजार 500 कोटी रुपये जमा करण्यात आलेत. असं असलं तरी असेही अनेक शेतकरी आहेत ज्यांनी पीएम किसानसाठी (PM Kisan Scheme) नोंदणी तर केलीय मात्र त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. असे शेतकरी त्यांच्या पीएम किसान योजनेच्या अर्जाचं स्टेटस पाहू शकतात आणि दुरुस्ती देखील करु शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या कारणामुळे पीएम किसान योजनेचे पैसे अडू शकतात?

पीएम किसान योजनेचा हप्ता न मिळण्याची अनेक कारणे आहेत. त्यात अर्ज करताना कागदपत्रांमधील त्रुटी किंवा खाते नंबरमधील चूक अशी कारणं असू शकतात. सध्या सर्व माहिती आधारशी लिंक असते. त्यामुळे आधारवरील तुमचं नाव आणि अर्जावरील तुमचं नाव सारखं असणं आवश्यक आहे. अर्जातील माहिती आणि आधारशी संलग्न माहिती मिळतीजुळती नसेल तर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता असते. म्हणूनच अर्ज करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

पीएम किसान योजनेच्या अर्जाचं स्टेटस कसं तपासणार?

तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलाय आणि तरीही तुम्हाला त्या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईट दोन्हींच्या माध्यमातून मदत घेऊ शकता. वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजेच स्टेटस जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in ला भेट द्या. या ठिकाणी होमपेजवर उजव्या कोपऱ्यात फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) आहे. तेथे तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक माहिती टाकून तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळाले याचे तपशील मिळतील. फार्मर्स कॉर्नर येथे त्रुटी असलेली माहिती दुरुस्त करण्याचाही पर्याय असतो. याचा उपयोग करुन तुम्ही तुमचा आधार क्रमांक किंवा इतर काही तपशील अपडेट करु शकता.

हेल्पालाईनद्वारे माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला 155261 किंवा टोल फ्री 1800115526 वर कॉल करता येईल. याशिवाय 011-23381052 वर कॉल करुनही माहिती मिळेल. pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवरही तक्रार करता येईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why some farmers not getting pm kisan scheme benefit how to correct pbs