Mahila Samman Savings Certificate महिलांना बचतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. वेगवेगळ्या बँका, पोस्ट ऑफिस यातर्फे या योजना राबवल्या जातात. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजनादेखील अशीच एक प्रसिद्ध योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीव ७.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. ही योजना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या नावानेही ओळखली जाते. आपण जाणून घेऊ या योजनेबाबत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला सन्मान योजनेसाठी अर्ज कसा करायचा? पात्रता काय?

टपाल कार्यालयं आणि शेड्युल्ड बँकांमध्ये जाऊन तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासाठी अर्ज करु शकता. या योजनेसाठी विशिष्ट अशी वयोमर्यादा नाही. ही योजना महिला आणि मुलींसाठी केंद्र सरकारने आणली आहे. मुली आणि महिलांमध्ये बचतीची सवय लागावी या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. सध्याच्य घडीला अनेक मुली, महिला या काम करताना दोन पैसे बाजूला टाकत असतात. त्यातून भविष्यात काही खर्च उद्भवले तर त्या एक प्रकारे तयारी करत असतात. अशा महिलांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे यात शंकाच नाही.

योजनेसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख काय?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची अखेरची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. या योजनेच्या अंतर्गत महिला १ हजार रुपयांपासून बच करु शकतात. तसंच ही योजना दोन वर्षांसाठी असणार आहे. त्या कालावधीत पैसे काढता येणार नाहीत. जर पैसे काढायचे असतील तर वर्षभर गुंतवणूक केल्यानंतर जमा रकमेपैकी ४० टक्के रक्कम काढता येईल.

ही योजना मुदतीच्या आधी बंद करता येईल का?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना दोन वर्षांसाठी आहे. ती आधी बंद करायची असल्यास वार्षिक व्याज दर हा ७.५० टक्के नसेल तर ५.५० टक्के असेल. तसंच ही योजना कुठल्याही कारणाने बंद करायची असल्यास गुंतवणूक करुन सहा महिने झाल्यानंतरच बंद करता येईल.

समजा एखाद्या महिलेने या योजनेच्या अंतर्गत बचत सुरु केली आहे आणि तिचा मृत्यू झाला तर मुद्दल आणि त्यावरील व्याज हे तिच्या वारसाला देण्यात येईल.

समजा एखाद्या अल्पवयीन मुलीसाठी ही बचत योजना सुरु करण्यात आली आहे आणि तिच्या पालकांना ती योजना आजारपणामुळे चालवता येणं शक्य नाही किंवा तिच्या पालकांचा मृत्यू झाल्यास आवश्यक ती कागदपत्रं सादर करुन ही योजना बंद करता येईल. असे निकषही सांगण्यात आले आहेत. महिलांच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahila samman savings certificate who is eligible interest rates how to apply what are the rules scj