Paytm Fastag Deactivate How to do it, a step by step guide for you : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने Paytm ला १५ मार्चनंतर कोणत्याही ग्राहकांकडून ठेवी आणि टॉप-अप स्वीकारणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पेटीएम पेमेंट बँकेतून फास्टटॅग सेवा बंद होणार आहे. यामुळे इतर अधिकृत बँकांना फास्टटॅग लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुना FASTag बंद करून नवं सुरू करता येणार आहे.

Paytm FASTag: पेटीएम फास्टॅग कसा निष्क्रिय कराल?

सध्याचे पेटीएम फास्टॅग खाते बंद करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आणि टॅग आयडी वापरू शकता. हे करण्यासाठी, १८००-१२०-४२१० वर कॉल करा आणि ज्यावर तुमचा फास्टटॅग रजिस्टर आहे तो मोबाइल नंबर नमूद करा. त्यासोबत वाहन नोंदणी क्रमांक (VRN) किंवा टॅग आयडी समाविष्ट करा. यानंतर पेटीएमच्या ग्राहक समर्थन एजंटशी संपर्क साधला जाईल.

हेही वाचा >> मोबाइल स्क्रीनवर अचानक दिसणाऱ्या LTE आणि VoLTE चा अर्थ काय?

पेटीएम फास्टॅग बंद करण्याचा दुसरा मार्ग

पेटीएम ॲपमध्ये, प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा आणि “Help & Support” वर क्लिक करा. त्यानंतर Banking Services & Payments वर क्लिक करून “FASTag” निवडा आणि “Chat with us” वर क्लिक करा. एक्झिक्युटिव्हला खाते निष्क्रिय करण्यास सांगा आणि प्रक्रिया पूर्ण होईल.

नवीन FASTag ऑनलाइन कसा खरेदी करायचा?

  • “My FASTag” ॲप डाउनलोड करा. “Buy FASTag” वर क्लिक करा जे तुम्हाला टॅग खरेदी करण्यासाठी ई-कॉमर्स लिंकवर घेऊन जाईल. FASTag खरेदी करा जो नंतर तुम्हाला वितरित केला जाईल.
  • “माय फास्टॅग” ॲपमध्ये, “Activate FASTag” वर क्लिक करा. Amazon किंवा Flipkart निवडा. FASTag ID प्रविष्ट करा आणि आपल्या वाहनाचे तपशील प्रविष्ट करा.त्यानंतर ते कार्यान्वित होईल.
  • एअरटेल पेमेंट्स बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँकेसह सदस्य बँकांमधून FASTags देखील खरेदी केले जाऊ शकतात.

हेही वाचा >> रिचार्ज न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक बंद होईल का? तुमचा मोबाइल क्रमांक इतरांना केव्हा दिला जातो?

व्यवहार प्रतिबंधासाठी मुतदवाढ

मध्यवर्ती बँकेच्या ३१ जानेवारीच्या मूळ आदेशानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये अतिरिक्त ठेवी स्वीकारण्यास, पत व्यवहारास किंवा प्रीपेड उपकरणे, वॉलेट्स, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड्समधील टॉप-अप पूर्णपणे थांबवण्यास सांगण्यात आले होते. आता हे व्यवहार प्रतिबंध २९ फेब्रुवारीऐवजी, १५ मार्चपासून लागू होणार आहेत.

मध्यवर्ती बँकेने सातत्याने नियमपालनांत हयगय केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँकेवर कामकाज थांबवण्याची कारवाई केली असून, यापुढे जाऊनही पर्यवेक्षी कारवाईची पावले टाकली जातील, असे स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी, मुदतवाढीच्या नव्या निर्देशांसह, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांच्या आणि सामान्य लोकांच्या सोयीसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि त्याचे निराकरण करणाऱ्या सोप्या उत्तरांची सूची देखील जारी केली आहे.