मोबाइल हा आपल्या रोजच्या जीवनातील भाग झाला आहे. कोणाशी बोलायचे झालं तर मोबाइलवर क्रमांक त्याचा टाईप करून फक्त कॉल करायचा….बास! आजकाल ड्युअल सीम मोबाइल असल्यामुळे अनेकांकडे दोन सीमकार्ड असतात. बऱ्याचदा त्याचा उपयोग होतो पण आपल्याकडे दोनपैकी एकच मोबाइल क्रमांक जास्त वापरला जातो आणि एक क्रमांक फारसा वापरात नसतो. त्यावर आपण रिचार्जदेखील करत नाही. नंतर जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण तो क्रमांक पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येते की वापरात नसलेला हा मोबाइल क्रमांक बंद झाला आहे. तुमच्याबरोबरही असे झाले आहे का? तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, किती काळानंतर वापरात नसलेला मोबाइल क्रमांक बंद पडतो? रिचार्ज न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक किती काळ सक्रिय राहील? बंद झालेला तुमचा क्रमांक दुसऱ्या कोणाला दिला जातो का? चला तर मग तुमच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…

रिचार्ज न केल्यास तुमचा क्रमांक किती काळ सक्रिय राहील? (How long will my number stay active for if I don’t recharge? )

तुमच्या मोबाइल क्रमांकावर सध्या केलेल्या रिचार्जची वैधता संपल्यानंतर तुम्ही पुन्हा रिचार्ज न केल्यास आउटगोइंग कॉल्स आणि मेसेज करू शकणार नाही. तसेच ९० दिवसांत कोणताही रिचार्ज न केल्यास, तुमचा मोबाइल क्रमांक बंद पडू शकतो.

hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
number of Pune residents spending lakhs of rupees to get attractive number for vehicle has increased
आकर्षक क्रमांकासाठी पुणेकरांचा होऊ दे लाखोंचा खर्च! जाणून घ्या सर्वांत महागडे क्रमांक…
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
IL and FS, NCLT Approval, Sell Shares, Insolvent Companies, Without Shareholders approval, finance, share,
दिवाळखोर कंपन्यांतील हिस्सा विक्रीस मंजुरी द्या, आयएल अँड एफएसची राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाकडे मागणी

बंद करण्यात आलेला मोबाइल क्रमांक किती काळ सक्रिय राहतो? (How active is a locked mobile number?)

९० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी वापरलेले नसलेले सिम किंवा मोबाइल क्रमांक अनेकदा निष्क्रिय मानले जाते आणि इतर संभाव्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी ३ महिन्यांनंतर पुन्हा नवीन क्रमांक म्हणून उपलब्ध केले जातात, मग ते प्रीपेड सिम असो किंवा पोस्टपेड सिम त्यासाठी समान नियम लागू होतात.

हेही वाचा – ‘पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘पंतप्रधान सूर्योदय योजना’ यात नेमका काय फरक आहे?

तुमचा मोबाइल क्रमांक इतरांना दिला जाऊ शकतो का? Can my phone number be assigned to someone else?

TRAI च्या टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन (सहावी दुरुस्ती) नियमावली, २०१३ च्या नियमन ११ नुसार टेलिकॉम ग्राहकांचा वापरात नसलेला मोबाइल क्रमांक बंद करू शकत नाही. एखादा मोबाइल क्रमांक वापरात नसला तरी कंपनी किमान ९० दिवस तो बंद करू शकत नाही. ९० दिवसांनंतरही हा क्रमांक वापरात नसेल तर तो बंद होऊ शकतो.

“वापरात नसलेल्या प्रीपेड मोबाइल क्रमांकांना पुन्हा वापरात आणण्यासाठी २०१३मध्ये हे नियम लागू करण्यात आले होते. भारताच्या दूरसंचार क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन १० अंकी मोबाइल क्रमांकाचे प्रमाण कमी होत चालले आहे आणि वापरात नसलेले क्रमांक पुन्हा वापरात आणणे अत्यावश्यक होते” असे इकॉनॉमिक लॉज प्रॅक्टिस या कायदा फर्मचे भागीदार अभय चट्टोपाध्याय यांनी TOI ला माहिती देताना सांगितले.

Gobi Manchurian Ban : गोव्यात कोबी मंच्युरियनवर बंदी! कसा तयार झाला ‘हा’ भारतीय-चायनीज खाद्यपदार्थ?

तुमचा मोबाइल क्रमांक सक्रिय ठेवण्यासाठी काय करू शकता? (What can you do to keep your mobile number active?)

चट्टोपाध्याय यांच्या मते, “जर प्रीपेड मोबाइल क्रमांकामध्ये किमान २० रुपये शिल्लक असेल तरच क्रमांक बंद करण्याआधी वापर न केल्याच्या ९० व्या दिवसापासून ३० दिवसांपर्यंत मुदतवाढ दिली जाते.

चट्टोपाध्याय म्हणतात, “बंद करण्यात आलेले मोबाइल कनेक्शन निष्क्रिय केल्याच्या तारखेपासून किमान १५ दिवसांची मुदत संपल्यानंतरच दुसऱ्या ग्राहकाला दिला जाईल आणि त्यामुळे असे प्रभावित ग्राहक या कालावधीत त्यांचा मोबईल क्रमांकावर रु. २० रिचार्ज करून एक पुन्हा चालू करू शकतात.”

हेही वाचा – मी चुकीच्या फोन नंबरला UPI ने पैसे पाठवल्यास परत कसे मिळतील? तज्ज्ञांचं सविस्तर व सोपं उत्तर वाचा

दोन लोकांना समान मोबाइल क्रमांक नियुक्त केला जाऊ शकतो? (Two people assigned the same phone number?)

सर्वसाधारणपणे, दोन लोकांसाठी एकच मोबाइल क्रमांक असणे शक्य नाही. याचे कारण असे आहे की प्रत्येक मोबाइल क्रमांक हा एक युनिक आयडेंटिफायर आहे. तो कॉल आणि टेक्स्ट मेसेज योग्य मोबाईलवर पाठवण्यासाठी वापरला जातो.

तुमचा मोबाइल क्रमांक दुसऱ्याला दिल्यावर काय होते? (What happens when your phone number is given to someone else? )

फसवणूक करणारे तुमचा मोबाइल क्रमांक वापरून तुमच्या ऑनलाइन खात्यांमध्ये (म्हणजे सोशल मीडिया किंवा बँकिंग) प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतात. ते तुमच्या मोबाइल क्रमांकावर पासवर्ड रीसेट करण्यासाठी लिंक पाठवू शकतात आणि ते तुम्हीच आहात असा विचार करून स्वयंचलित प्रणालींना फसवू शकतात. तुम्हाला मालवेअर किंवा स्पायवेअर पाठवू शकतात.