इटलीमध्ये स्थित पिसाचा झुकलेला टॉवर हा वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही इमारत पायापासून चार अंशांनी झुकलेली आहे. सुमारे ५४ मीटर उंच असलेला पिसाचा झुकलेला टॉवर जगभर प्रसिद्ध आहे. पण, आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये असलेल्या पिसा टॉवरपेक्षाही सुंदर मंदिराबद्दल सांगणार आहोत. हे मंदिर वाराणसीतील मणिकर्णिका घाटाच्या अगदी समोर आहे, हे मंदिर रत्नेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- भारतात कोणते प्राणी कायदेशीररित्या पाळीव प्राणी म्हणून पाळले जाऊ शकतात?

वाराणसीतील गंगा घाटावरील सर्व मंदिरे वरच्या दिशेने बांधलेली आहेत. तर रत्नेश्वर मंदिर मणिकर्णिका घाटाच्या खाली बांधलेले आहे. घाटाच्या खाली असल्यामुळे हे मंदिर वर्षातील सहा महिन्यांहून अधिक काळ गंगा नदीच्या पाण्यात बुडलेले असते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी मंदिराच्या कळसापर्यंत पोहोचते. स्थानिक पुजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या मंदिरात वर्षातून केवळ दोन-तीन महिनेच पूजा होते. बाकीचे महिने हे मंदीर पूर्णपणे पाण्यात असते

हेही वाचा- पक्ष्यांना गुडघे असतात का? त्यांच्या पायांची रचना विचित्र का असते?

रत्नेश्वर मंदिर त्याच्या पायापासून ९ अंशांवर आहे आणि त्याची उंची १३.१४ मीटर आहे. या मंदिराची वास्तू अतिशय अलौकिक आहे. शेकडो वर्षांपासून हे मंदिर एका बाजूला झुकले आहे. या मंदिराबाबत अनेक प्रकारच्या दंतकथा प्रचलित आहेत. दगडांनी बनवलेले हे मंदिर जवळपास ३०० वर्षे वाकलेल्या अवस्थेत असूनही उभे कसे याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.

हेही वाचा- Petrol Vs Diesel Car: पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कार जास्त मायलेज देते? ‘हे’ आहे यामागील कारण…

मंदिराच्या एका बाजूला झुकण्यामागे अनेक दंतकथा सांगितल्या आहेत. असे म्हणतात, राजा मानसिंगच्या एका सेवकाने हे मंदिर आपल्या आई रत्नाबाईसाठी बांधले होते. मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर सेवकाने घोषणा केली की, मी माझ्या आईचे ऋण फेडले आहे. सेवकाने ही घोषणा करताच मंदिर मागे झुकू लागले. आईचे ऋण कधीच फेडता येणार नाही, म्हणून हे घडले अशी ही मान्यता आहे. तर काहींच्या मते अनेक वर्षांपूर्वी मंदिराच्या बाजूचा घाट कोसळला होता, त्यामुळे मंदिर एका बाजूला झुकले असल्याचे सांगण्यात येते. पावसाळ्यात या मंदिरात पूजा केली जात नाही, कारण लोकांचा असा विश्वास आहे की, हे मंदिर शापित आहे आणि येथे पूजा केल्याने त्यांच्या घरात काही वाईट होऊ शकते.

हेही वाचा- हत्तीची सोंड लांबच का असते? ‘हे’ आहे त्यामागील खरे कारण….

अहिल्याबाई होळकरांच्या दासीने हे मंदिर बांधले होते

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणसीतील अनेक मंदिरे आणि तलाव राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. अहिल्याबाई होळकर यांच्या दासी रत्नाबाई हिने मणिकर्णिका घाटासमोर शिवमंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली आणि हे मंदिर बांधले. त्या दासीच्या नावावरून या मंदिराला रत्नेश्वर असे नाव पडले. १९ व्या शतकात या मंदिराचे निर्माण झाले. रत्नेश्वर मंदिर भगवान शिव यांचे मंदिर आहे. या मंदिराला मातृ-रिन महादेव, वाराणसीचे झुकलेले मंदिर किंवा काशी करवट असेही म्हणतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratneshwar temple of varanasi is more tilted than pisa tower know the reason dpj