Royal City of India: रॉयल शब्द याआधी अनेकांनी ऐकला असेल. आपण अनेकदा या शब्दाचा वापरही करतो. या शब्दात इतकी ताकद आहे की, त्यामुळे त्या व्यक्ती, वस्तू, वास्तू वा शहराचे महत्त्व स्पष्ट होते. रॉयल हा शब्द राजेशाही शैली आणि समृद्धीसाठी ओळखला जातो आणि अशाच भव्य आणि श्रीमंत वास्तूंसाठी या शब्दाचा वापर केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा वापरल्या जाणाऱ्या या शब्दाचा आपण तितकासा विचार करीत नाही. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, भारतातील एका शहराला ‘रॉयल सिटी’ म्हणून ओळखले जाते. पण, हे रॉयल शहर नेमकं कोणतं आहे हे तुम्हाला माहीत आहे? नाही ना… म्हणूनच या लेखातून आपण भारताच्या रॉयल सिटीविषयी म्हणजेच पंजाबमधील पटियाला या शहराविषयी जाणून घेणार आहोत.

हेही वाचा… जगातील सर्वांत महागडी नाणी कोणती? एकेकाची किंमत ऐकून बसेल धक्का

भारताची रॉयल सिटी- पंजाब राज्यातील पटियाला शहर

पंजाब राज्यातील पटियाला हे शहर ‘रॉयल ​​सिटी ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. बाबा अला सिंग यांनी १७६३ मध्ये स्थापन केलेले हे शहर एकेकाळी पटियाला संस्थानाची राजधानी होती. शहराचे नाव, ज्याचा मूळ अर्थ बाबा अला सिंगची जमीन आहे, त्याचा शाही वंश त्यातून प्रतिबिंबित होतो.

ऐतिहासिक किल्ले

पटियाला हे राजवाडे, किल्ले व उद्यानांचे शहर म्हटले जाते. ‘किला मुबारक’ किल्ल्यासह भव्य शाही इमारती व राजवाडे यांनी हे शहर सुशोभित आहे.

हेही वाचा… भारतातील ‘या’ राज्याला कोहिनूर म्हटलं जातं, यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या…

संस्कृती

पटियाला हे एक प्रचंड सांस्कृतिक वारसा असलेले राज्य आहे. शहरातील कला, वास्तुकला व रस्ते येथे एकेकाळी राज्य करणाऱ्या महाराजांची कथा सांगतात. पटियाला हे उत्तम घराणे संगीत, प्रसिद्ध पाक परंपरा व पटियालवी कलाकुसरीसाठीही ओळखले जाते.

स्थान

पटियाला दक्षिण-पूर्व पंजाबमध्ये, चंदिगडच्या नैर्ऋत्य-पश्चिमेस सुमारे ३० मैल (५० किमी) स्थित आहे. हे प्रमुख रेल्वे मार्ग आणि सरहिंद कालव्याच्या एका शाखेवर वसलेले आहे. त्याच्या सांस्कृतिक वारशामुळे याला ‘रॉयल सिटी’, असे म्हणतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal city of india do you know which city is royal dvr