भारताबाहेर जायचं असेल दोन गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एक म्हणजे व्हिसा आणि दुसरा म्हणजे पासपोर्ट. या दोन गोष्टींपैकी एक जरी नसेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणारच नाही. पण कधी कधी अशीही वेळ येते की पासपोर्ट तयार करायला पुरेसा वेळ नसतो. अशावेळी पर्याय असतो तत्काळ पासपोर्टचा.

तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी किती वेळ लागतो?

आपल्याला नेहमीच्या प्रक्रियेप्रमाणे पासपोर्ट काढायचा असेल तर त्याला कमीत कमी २० ते ४५ दिवस लागतात. मात्र तात्काळ पासपोर्ट काढायचा असेल तर एक ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. अर्जाचा दिवस वगळून तिसऱ्या Working Day ला हा पासपोर्ट मिळतो.

तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा?

तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा याचा विचार करत आहात का? या सोप्या स्टेप्स फॉलो करा

पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा.

पोर्टलवर खाते तयार केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा.

या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडा – ‘फ्रेश/री-इश्यू’.

योजनेचा प्रकार म्हणून “तात्काळ” निवडा.

अर्ज डाऊनलोड करा आणि आपले नाव, नोकरीचा प्रकार, कौटुंबिक तपशील इत्यादी अशा संबंधित तपशीलांसह भरा.

ऑनलाइन फॉर्म सबमिट करा आणि ऑनलाइन पेमेंट करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

पावतीची प्रिंटआऊट घ्या आणि तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात (पीएसके) अपॉइंटमेंट बुक करा.

तात्काळ पासपोर्टसाठी फी किती आहे?

Passportindia.gov.in नुसार ३६ पानांच्या पासपोर्टसाठी अर्ज केल्यास ३ हजार ५०० रुपये भरावे लागतील तर ६० पानांच्या पासपोर्टसाठी ४ हजार रुपये भरावे लागतील.
तात्काळ पासपोर्ट फी कशी भरता येईल?

ऑनलाइन पेमेंटसाठी तुम्ही खालील तीन पर्याय निवडू शकता.

इंटरनेट बँकिंग

क्रेडिट कार्ड

डेबिट कार्ड

तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रावर लागू तात्काळ पासपोर्ट शुल्क रोख देखील भरू शकता. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चालानद्वारे ही रक्कम भरता येणार आहे.

तात्काळ पासपोर्टसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालीलपैकी कोणतीही तीन कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे

आधार कार्ड

वोटर कार्ड

एससी/एसटी/ओबीसी प्रमाणपत्र

पॅन कार्ड

रेशन कार्ड

शस्त्र परवाना

सेवेमध्ये ओळख दाखवणारे कार्ड

मालमत्तेची कागदपत्रे

गॅस बिल

ड्रायव्हिंग लायसन्स

जन्म प्रमाणपत्र

पेन्शन कागदपत्रे

बँक/पोस्ट ऑफिस/किसान पासबुक

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्याचे ओळख दाखवणारे कार्ड

अशा पद्धतीने तुम्ही तात्काळ पासपोर्ट काढू शकता.