हल्ली तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण सर्रास जीन्सचा वापर करताना दिसतात. अगदी लग्नकार्यापासून फिरायला जाण्यापर्यंत सर्व प्रसंगी जीन्सचा वापर केला जातो. जीन्स परिधान केल्यानंतर स्टायलिश लूक तर येतोच, मात्र त्याबरोबर दिवसभर त्यात वावर करणेही सहज सोपं होतं. आपण आपल्या जीन्सच्या खिशात मोबाईल, पाकीट, पैसे अशा अनेक गोष्टी ठेवतो. पण याच जीन्सच्या खिशावर लहान लहान बटणं असतात. पण ती नेमकी तिथे का असतात? त्याचा नेमका उद्देश काय? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण अनेकदा जीन्सच्या खिशात काही तरी वस्तू ठेवताना किंवा ती खरेदी करतेवेळी ही बटण पाहिलीचं असतील. पण ती का लावलेली असतात? याची माहिती फार कमी लोकांना आहे. जीन्सच्या खिशाजवळ असलेली ही बटण फक्त स्टाईलसाठी दिलेली असावीत, असा काहींचा समज असतो. पण असं अजिबात नाही, जीन्सच्या खिशाजवळ असलेल्या या बटणांमागे फार मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे.
आणखी वाचा : कारखान्यांच्या छतावर असलेली घुमटवजा वस्तू नेमकी का लावली जाते? जाणून घ्या खरं कारण

पूर्वीच्या काळात डेनिम किंवा जीन्स ही पँट श्रमाचे काम करणारे कामगार वापरत असे. श्रमाचे काम करणाऱ्या कामगारांच्या जीन्सचे खिसे हे नेहमी फाटायचे. त्यावेळी खिसा फाटला म्हणून दरवेळी नवी जीन्स घेणे परवडायचे नाही. यामुळे १८७३ साली जेकब डेव्हिस या नावाच्या टेलरने यावर उत्तम पर्यायी मार्ग शोधून काढला.

विशेष म्हणजे जेकब हा Levi Strauss & Co. या कंपनीच्या जीन्स वापरत होता. त्यावेळी जेकबने जीन्सच्या फाटणाऱ्या खिशांवर उपाय म्हणून त्याच्या कोपऱ्यात धातूची बटण लावण्याचा सल्ला दिला. यामुळे हे खिसे जीन्सला कायम चिकटून बसतील आणि ते फाटणारही नाहीत.

आणखी वाचा : गोंडस चेहरा, निरागस डोळे; निकसारखीच हुबेहुब दिसते प्रियांका चोप्राची लेक, फोटो पाहिलेत का?

जेकबची ही कल्पना फार उत्तम होती. त्याला त्याच्या या कल्पनेचे पेटंट काढायचे होते. मात्र पैशाच्या अडचणीमुळे त्याला ते करणं शक्य नव्हते. १८७२ मध्ये त्याने Levi Strauss ला पत्र लिहून त्याची ही कल्पना विकण्याचा प्रस्ताव ठेवला. कंपनीला ही कल्पना विकत घेण्यासाठी त्याने एक अटही ठेवली. जेकबला कंपनीने पेटंटसाठी पैसे पुरवावेत, अशी ही अट होती. त्यानंतर आजपर्यंत धातूची छोटी बटणं जीन्सचा अविभाज्य भाग बनली.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is the reason your jeans pockets have tiny buttons on them nrp