scorecardresearch

कारखान्यांच्या छतावर असलेली घुमटवजा वस्तू नेमकी का लावली जाते? जाणून घ्या खरं कारण

ते घुमट छतावर का लावतात? त्याचे नेमकं कारण काय? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

What is Turbo Ventilator
कारखान्यांच्या छतावर असलेली घुमटवजा वस्तू नेमकी का लावली जाते?

आपण चालताना, फिरताना आपल्या अवतीभवती अनेक गोष्टी पाहतो. या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची आपल्याला प्रचंड इच्छा असते. आपण अनेकदा बाहेर फिरायला जाताना हायवेवर आजूबाजूला काही कारखाने पाहतो. या कारणांच्या छतावर स्टेनलेस स्टीलने बनवलेली छोटी घुमटवजा वस्तू दिसते. सूर्यप्रकाशामध्ये अत्यंत चमकदार दिसणारे हे घुमट फिरताना फार चांगले दिसतात. पण ते घुमट छतावर का लावतात? त्याचे नेमकं कारण काय? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

अनेक कारखान्यांच्या छतावर बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे छोट्या घुमटाप्रमाणे दिसणाऱ्या या गोष्टीला टर्बो व्हेंटिलेटर (Turbo Ventilator) असे म्हटले जाते. त्याबरोबर त्याला एअर व्हेंटिलेटर (Air Ventilator), टर्बाइन व्हेंटिलेटर (Turbine Ventilator), रुफ एक्सट्रॅक्टर (Roof Extractor) यांसारख्या इतर नावानेही ओळखले जाते.

सध्याच्या काळात टर्बो व्हेंटिलेटर हे केवळ कारखाने आणि मोठ्या स्टोअरमध्येच नव्हे तर इतर ठिकाणीही लावले जातात. त्याबरोबर मोठ्या रेल्वे स्थानकांवरील छतावर हे टर्बो व्हेंटिलेटर लावल्याचे पाहायला मिळते.

टर्बो व्हेंटिलेटरचे मुख्य काम काय?

कारखाने, रेल्वे स्थानक तसेच इतर ठिकाणी लावण्यात आलेले टर्बो व्हेंटिलेटरचे पंखे हे मध्यम गतीने चालतात. याचे मुख्य काम कारखान्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील गरम हवा बाहेर फेकणे असते.

टर्बो व्हेंटिलेटरद्वारे गरम हवा बाहेर फेकली जाते. तर त्याचवेळी खिडकी किंवा दरवाज्यामधून नैसर्गिक वारे कारखान्यांमध्ये येतात. तसेच हे बराच काळ टिकतात. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना गरमीचा त्रास होत नाही.

कर्मचाऱ्यांना फायदा

विशेष म्हणजे टर्बो व्हेंटिलेटर गरम हवा बाहेर फेकण्यासोबतच कारखान्यातील दुर्गंध बाहेर टाकण्याचे काम करतो. इतकंच नव्हे तर हवामान बदलल्यानंतर ते आतील आर्द्रताही बाहेर फेकते. यामुळे याचा मोठा फायदा हा कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतो. त्यामुळे अनेक कारखान्यांच्या छतावर हे व्हेंटिलेटर पाहायला मिळतात.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 14:34 IST
ताज्या बातम्या