Types of Bank Cheques: सध्याच्या घडीला बँक व्यवहार करणं अगदीच सोपं झालं आहे. म्हणजेच आपल्याला हातात असलेल्या स्मार्ट फोनमध्येच सगळं बँकिंग आलं आहे. ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट या सगळ्याचा ट्रेंड वाढला आहे. तरीही जर मोठी रक्कम द्यायची असेल तर चेक म्हणजेच धनादेशाचा वापर केला जातो. या धनादेशाचे प्रकार किती आहेत? कुणी म्हणजे क्रॉस आणि बेअरर पण हे दोनच प्रकार आहेत. पण हे दोन प्रकारच नाहीतर तर एकूण नऊ प्रकार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेअरर चेक

बेअरर चेक म्हणजे असा चेक किंवा धनादेश ज्याचं नाव चेकवर लिहिलेलं असतं. तो माणूस हा चेक बँकेत डिपॉझिट करु शकतो. बेअरर चेकचा सोपा अर्थ की जो माणूस हा चेक घेऊन बँकेत जाईल तो माणूस ती रक्कम बँकेतून काढू शकतो. तसंच हा चेक कुणालाही ट्रान्सफर केला जाऊ शकतो. जर हा चेक हरवला तर ज्याला तो सापडेल तो हा चेक डिपॉझिट करु शकतो. कारण चेकवरील रक्कम कुणाला द्यायची याची शहानिशा केली जात नाही.

ऑर्डर चेक म्हणजे काय?

ऑर्डर चेक त्याच व्यक्तीला दिला जातो ज्याचं नाव चेकवर लिहिलेलं असतं. या चेकवर Or Bearer हा शब्द काट मारलेला असतो आणि Or Order असं लिहिलेलं असतं. ज्याचं नाव चेकवर आहे त्याच व्यक्तीला चेकवर लिहिण्यात आलेली रक्कम दिली जाते. तसंच चेकवरील रक्कम देण्यापूर्वी चेकवर नाव लिहिलेली व्यक्तीच आली आहे ना? याची खात्री केली जाते. त्याचमुळे हा चेक सुरक्षित मानला जातो. या चेकला Payable to Order चेक असंही म्हटलं जातं.

क्रॉस्ड चेक

चेकचा तिसरा प्रकार आहे क्रॉस्ड चेक. हा चेकही व्यवहारांसाठी सुरक्षित चेक मानला जातो. या चेकच्या डाव्या कोपऱ्यात दोन समांतर रेषा आखल्या जातात. त्यामुळे या चेकला क्रॉस्ड चेक असं म्हटलं जातं. हा चेकवरची रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यातच जमा होते. क्रॉस्ड चेक कुणीही बँकेत जमा केला तरीही ज्याचं नाव चेकवर लिहिलं आहे त्याच व्यक्तीच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाते.

ओपन चेक म्हणजे काय?

ओपन चेक हा एक प्रकार आहे. त्याला अनक्रॉस्ड चेक असंही म्हटलं जातं. हा चेकही बेअरर प्रमाणेच असतो. या चेकने कुणीही खात्यातले पैसे काढू शकतो. जर हा चेक हरवला तरीही इनकॅश करता येतो. त्यामुळे व्यवहारांच्या दृष्टीने हा चेक फारसा सुरक्षित मानला जात नाही.

पोस्ट डेटेड चेक म्हणजे काय?

पोस्ट डेटेड चेक म्हणजे असा चेक जो पुढच्या तारखेचा चेक असतो. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पुढच्या तारखेचा चेक द्यायचा असेल तर या चेकचा वापर केला जातो. या प्रकारच्या चेकवर पुढची तारीख लिहिलेली असते म्हणून याला पोस्ट डेटेड चेक म्हटलं जातं. हा चेक कधीही जमा केला तरीही या चेकवर जी तारीख लिहिलेली असते त्याच तारखेला पैसे जमा केले जातात.

स्टेल चेक म्हणजे काय?

स्टेल चेक म्हणजे असा चेक ज्याची व्हॅलिडिटी संपली आहे आणि तो एक्स्पायर झाला आहे. हा चेक इनकॅश करता येत नाही. सुरुवातीला चेकची तारीख लिहिल्यानंतर चेक सहा महिने चालू शकत होता. आता ही मुदत तीन महिने करण्यात आली आहे. याचाच अर्थ चेकवरील तारखेपासून तीन महिन्यांनी हा चेक स्टेल चेक होतो. तो बँकेत जमा करता येत नाही.

ट्रॅव्हलर चेक म्हणजे काय?

सुट्टीच्या निमित्ताने किंवा अगदी दोन तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रवास करत असताना अनेकदा लोक रोख रक्कम बाळगण्यापेक्षा चेकचा उपयोग जास्त करतात. त्या चेकला ट्रॅव्हलर चेक म्हटलं जातं. कारण सुट्टी असताना जर पैशांची आवश्यकता भासली तर लोक कोअर बँकिंगचा उपयोग करुन संबंधित बँकेच्या खात्यातून पैसे काढतात. हा चेक एक्स्पायर होत नाही त्यामुळे तुम्ही एखाद्या ट्रीपमध्ये तो वापरला नाहीत तर पुढच्या दौऱ्यातही तो वापरण्याची मुभा असते.

सेल्फ चेक

सेल्फ असं लिहिलेलाही एक चेक असतो. अकाऊंट होल्डर हा चेक स्वतःसाठी लिहून देत असतो. चेक लिहिणारा व्यक्ती नावाच्या रकान्यात Self असं लिहितो. त्यामुळे हा चेक ज्याला दिला जातो तो व्यक्ती खातं असलेल्या व्यक्तीसाठी पैसे काढू शकतो. हा चेकही सेफ असतो कारण बँक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडे सेल्फ लिहिलेला चेक असतो त्याचे सगळे तपशील आणि सही घेतली जाते. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

बँकर्स चेक म्हणजे नेमकं काय?

बँकर्स चेक म्हणजे असा चेक जो खातेदाराच्या वतीने बँक जारी करते. हा एक प्रकारचा ड्राफ्ट असतो ज्याला डिमांड ड्राफ्ट (DD) असं म्हणतात. या चेकच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या शहरातला व्यक्तीलाही डीडीच्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. असे ९ प्रकार चेकचे आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Types of bank cheques wha are the types of cheques in banking know about it scj