Virat Kohli Yo- Yo Test Score: आशिया चषक २०२३ साठी तयारी करत असताना, विराट कोहलीने गुरुवारी त्याचा यो-यो टेस्ट स्कोअर इन्स्टाग्रामवर शेअर केला. आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानल्या जाणार्‍या या भारतीय फलंदाजाने फिटनेस चाचणीत १७.२ गुण मिळवले. वयाच्या ३४ व्या वर्षी कोहलीच्या फिटनेसकडे पाहून चाहते थक्क झाले आहेत. पण हा उत्साह आता विराट कोहलीला भारी पडणार असल्याचे दिसतेय. कोहलीने टेस्ट स्कोअर शेअर केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अशाप्रकारे गोपनीय माहिती सोशल मीडियावर शेअर करणे चुकीचे आहे अशी तक्रार केली आहे. विराट कोहलीला अडचणीत आणू शकणारा हा यो- यो टेस्ट स्कोअर नेमका काय प्रकार आहे? ही चाचणी कोण व कशासाठी घेतं याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यो-यो टेस्ट म्हणजे काय? (What Is Yo- Yo Test)

यो-यो टेस्ट ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूची शारीरिक क्षमता मोजणारी बहुआयामी फिटनेस चाचणी आहे. काही आंतरराष्ट्रीय बोर्डांनी राष्ट्रीय संघात निवड होण्यापूर्वी खेळाडूला ही चाचणी पास करणे अनिवार्य केले आहे. ही टेस्ट बिप आवाजानुसार मॉनिटर केली जात असल्याने त्याला बीप बीप टेस्ट असेही म्हणतात. यो यो टेस्टमध्ये समाविष्ट सर्व चाचण्या खेळाडूची हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शक्ती आणि आधुनिक खेळाच्या दबावाला तोंड देण्याची त्यांची क्षमता तपासण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

यो-यो टेस्ट सुरु कधी झाली? (When Did Yo- Yo Test Started)

डॅनिश सॉकर फिजिओलॉजिस्ट डॉ जेन्स बॅंग्सबो यांनी १९९० च्या दशकात इंटरमिटंट रिकव्हरी टेस्ट (यो-यो चाचणी) सुरू केली. फुटबॉलपटूंची एकूण तंदुरुस्ती आणि एरोबिक क्षमता सुधारण्यासाठी सुरुवातीला ही चाचणी घेण्यात आली. मात्र यावेळी टेस्टमध्ये लांब पल्ल्याच्या धावण्याचा फॉरमॅट पाळला नाही. कालांतराने, इतर खेळांनी यो-यो टेस्ट स्वीकारण्यास सुरुवात केली. माजी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक शंकर बसू यांनी २०१७ मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय संघाला यो-यो टेस्टची ओळख करून दिली.

यो यो टेस्ट कशी केली जाते? (How To Take Yo-Yo Test)

यो- यो टेस्टसाठी साधारण सहा स्टेप्स फॉलो केल्या जातात, या खालीलप्रमाणे ..

पहिली स्टेप : धावण्यासाठी सज्ज व्हा – धावपटू धावपटूच्या वृत्तीने सुरुवात करण्याची तयारी करतो.

दुसरी स्टेप: जेव्हा खेळाडू प्रशिक्षकाकडून बीप ऐकतो तेव्हा तो धावू लागतो. धावपटूला दुसऱ्या बीपच्या आधी पुढील शंकूपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

तिसरी स्टेप: दुसरा शंकू गाठल्यावर धावपटू गोल फिरतो आणि सुरुवातीच्या पॉईंटकडे वळून उभा राहतो.

चौथी स्टेप: बीट द थर्ड बीप – धावपटू सुरुवातीच्या बिंदूकडे परत येतो आणि तिसर्‍या बीपच्या आधी त्याला तिथे पोहोचावे लागते.

पाचवी स्टेप: १० सेकंद आराम दिला जातो.

सहावी स्टेप: एक पासून चार पर्यंतच्या स्टेप पुन्हा केल्या जातात.

यो- यो टेस्टचा स्कोअर कसा मोजायचा? (Yo Yo Test Score Calculation)

उदाहरणार्थ, जर तुम्हाला यो यो स्कोअर १८०० दिसला तर याचा अर्थ धावपटूने १८ मीटर अंतर कापले आहे. यो यो टेस्टचा आजवरचा सर्वोच्च स्कोअर २३ आहे. प्रत्यक्षात या पातळीच्या जवळही कोणीही जात नाही.

हे ही वाचा<< Asia Cup 2023 साठी भारतीय संघ ठरला! श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, बुमराहचं पुनरागमन, ‘या’ खेळाडूंना डच्चू

खरंतर तुम्ही सुद्धा घरच्या घरी किंवा मैदानात या पद्धतीने तुमचा फिटनेस पडताळून पाहू शकता. पण यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल. जर आपल्याला दमा किंवा हृदयाच्या संबंधित तक्रारी असतील तर परस्पर अशी चाचणी करणे टाळावे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli in problem before asia cup 2023 due to yo yo test score how exactly yo yo test is conducted why bcci unhappy svs