Premium

बंदुकीच्या गोळीचा वेग किती असतो? गोळी किती लांब मारा करू शकते; घ्या जाणून….

क्षणात एखाद्याचा जीव घेणाऱ्या बंदुकीच्या गोळीचा वेग एवढा असतो की, त्या वेळी ती गोळी आपण डोळ्यांनी नीट बघूही शकत नाही.

What is the speed of a gun bullet
बंदुकीच्या गोळीचा वेग किती असतो? (प्रतिकात्मक छायाचित्र, लोकसत्ता)

अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये तुम्ही बंदुकीतून गोळी मारण्याबाबतचे सीन बघितलेच असतील. बंदुकीतून झाडलेली गोळी वेगाने माणसाच्या शरीरात घुसते आणि क्षणात त्याचा जीव घेते. या गोळीचा वेग इतका असतो की, तुम्ही त्या वेळी ती गोळी डोळ्यांनी नीट बघूही शकत नाही. आता बंदुकीच्या गोळीचा वेग नेमका किती असतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग त्याबाबत जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- भारतातील मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? पाकिस्तानचा कोड काय? हे कोण ठरवतं? जाणून घ्या…

बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीचा वेग किती असतो?

बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीचा वेग वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांवर अवलंबून असतो. प्रत्येक बंदुकीची स्वतःची वैशिष्ट्ये असतात आणि बंदुकीच्या वैशिष्ट्यांनुसार गोळीचा वेग किती असू शकतो हे ठरविले जाते. बंदुकीची रचना आणि बॅरलची लांबी यावरही त्यातून सुटलेल्या गोळीचा वेग अवलंबून असतो. साधारणपणे कोणत्याही बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीचा वेग हा २,५०० फूट प्रतिसेकंद इतका मानला जातो. बरेच लोक बंदूक आणि रायफल एकच मानतात; पण तसे नाही. रायफल आणि बंदूक यात खूप फरक आहे. बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीचा वेग आणि रायफलमधून बाहेर पडणाऱ्या गोळीचा वेग यांत मोठा फरक आहे. बंदुकीतून निघालेल्या गोळीपेक्षा रायफलमधून सुटलेली गोळी वेगवान असते.

हेही वाचा- ‘पेग’ म्हणजे काय? मद्य ३०,६० आणि ९० मिली या प्रमाणातच का मोजले जाते? जाणून घ्या कारण…

२२३ बोअरच्या रेमिंग्टन रायफलच्या जॅकेट बुलेटचा वेग सर्वाधिक आहे. ही बुलेट ३,२४० फूट प्रतिसेकंद वेगाने बाहेर पडते. म्हणजे ध्वनीचा वेगापेक्षाही या बुलेटचा वेग अधिक आहे. ध्वनीचा वेग ११०० फूट प्रतिसेकंद मानला जातो. गोळीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत गोळीने तुमचे शरीर भेदलेले असते.

हेही वाचा- १.३० ला दीडच का म्हणतात? साडे एक का म्हणत नाहीत? ‘हे’ आहे त्यामागचं कारण

बंदुकीतून गोळी बाहेर पडते तेव्हा त्यात प्रचंड ऊर्जा आणि वेग असतो. जर एखाद्याला बंदुकीची गोळी लागली, तर त्याला गंभीर जखम तरी होते किंवा त्या व्यक्तीचा जीव तरी गेलेला असतो. बंदुकीच्या गोळीचा वेग हा तिच्या वजन व जाडीसह आकारावरही अवलंबून असतो. तसेच बंदुकीतून झाडलेली गोळी किती लांब जाईल हे आजूबाजूचे हवामान, वाऱ्याची दिशा आणि त्या गोळीचा मार्ग यांवरही अनेकदा अवलंबून असते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the speed of a gun bullet know hear dpj

First published on: 09-12-2023 at 16:41 IST
Next Story
भारतातील मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? पाकिस्तानचा कोड काय? हे कोण ठरवतं? जाणून घ्या…