छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत होते, आहेत आणि राहतील. स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केली. त्यांचा आदर्श आजही डोळ्यांसमोर ठेवून अनेक लोक प्रेरित होतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठवावा प्रताप हे आजही बोललं जातं. शिवचरित्रातून प्रेरणा घेतली जाते. त्यांच्या आयुष्यावर आत्तापर्यंत अनेक कादंबऱ्या, नाटकं, चित्रपटही आले आहेत. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज हे म्हटलं जाण्यापूर्वी काय म्हटलं जात असे? इतिहासकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी याचं उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदानंद मोरे काय म्हणतात?

“शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात राज्य करु लागले तेव्हा त्यांचे मावळे, त्यांचे सरदार, त्यांच्या प्रशासनातले लोक, सैन्यातले सैनिक त्यांना काय म्हणत होते? हे सगळे त्यांना साहेब म्हणत होते. साहेब हा शब्द सत्तावाचक, अधिकारवाचक आहे. साहेब हा शब्द पर्शियन भाषेमुळे आपल्या भाषेत आला आणि रुढ झाला. पर्शियन बोलणाऱ्यांचं राज्य गेलं, मराठी बोलणाऱ्यांचं राज्य आलं तेदेखील गेलं. त्यानंतर इंग्रज आले, म्हणजेच इंग्रजी बोलणाऱ्याचं राज्य आलं. तरीही साहेब हा शब्द कायम राहिला. आपण पुढे इंग्रजांसाठी साहेब शब्द वापरला. हा शब्द मुळात इंग्रजांसाठी नव्हता. शिवाजी महाराजांना हे वाटू लागलं की आपल्याला आपल्या भाषेतले शब्द हवेत. सत्तावाचक शब्द असले पाहिजेत हे त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी सुरुवात केली साहेब या शब्दापासून. त्याला पर्यायी शब्द आणला महाराज. त्यामुळे असं ठरलं की छत्रपती शिवरायांना साहेब शब्दाऐवजी महाराज म्हणायचं. महाराज शब्दाचा उपयोग करायचा हे ठरलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव त्या उपाधीसह रुढ झालं”

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What was chhatrapati shivaji called before his maharaj title do you know that title scj
First published on: 28-02-2024 at 19:21 IST