चॅट जीपीटीबद्दल (Chat GPT) जगभरात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. शिवाय अनेक लोक रोज चॅट जीपीटीला वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांपासून जॉब करणारे लोकही चॅट जीपीटीला अवघड प्रश्न विचारुन योग्य उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. अशातच आता एका व्यक्तीने अनेक दिवसांपासून कोणीही ठाम उत्तर न दिलेला प्रश्न चॅट जीपीटीला विचारला आहे. तो प्रश्न म्हणजे, पृथ्वीवर सर्वात आधी अंडं आलं की कोंबडी?. महत्वाची बाब म्हणजे चॅट जीपीटीने या प्रश्नाचेही उत्तर दिले आहे. खरं तर या प्रश्नावर अनेकदा चर्चा होत असते, पण त्याचं समाधानकारक उत्तर कोणीच देऊ शकत नाही.
वैज्ञानिक उत्तर नाही!
चॅट जीपीटीला अंडं आणि कोंबडीबाबत प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं की, कोंबडी आधी आली की अंडी याबाबतचं उत्तर कोणालाही माहीत नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक तथ्यांवर आधारित नाही. हे एखाद्या धार्मिक प्रश्नासारखे आहे, ज्याचे कोणत्याही वैज्ञानिक आधाराद्वारे ठाम उत्तर देता येत नाही.
वेगवेगळे दृष्टीकोन –
चॅट जीपीचीने पुढे सांगितलं की, या प्रश्नाबाबत वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. काही लोक मानतात की, आधी अंडी आली आणि नंतर कोंबडी. तर काही लोक आधी कोंबडी आली आणि त्यानंतर ती अंडी घालू लागली. तर अंडी आणि कोंबडी दोघांनाही निसर्गाने एकाच वेळी निर्माण केल्याचही काही लोक मानतात. दुसरीकडे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, अंड आणि कोंबडी हे दोन्ही एक प्रकारचे जीव आहेत आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया एकत्रितपणे विकसित झाली असावी.
हेही पाहा- तरुणाने बाईकमध्ये पेट्रोलऐवजी दारु भरली अन्…, व्हायरल Video पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल
या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नाही –
कोंबडी अंडी घालते जी नंतर पिल्लांना जन्म देते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नाही. शिवाय ते भिन्न दृष्टिकोन आणि गृहितकांवर आधारित आहे. तुम्ही त्यावर विनोदी पद्धतीने किंवा सखोल चर्चा करू शकता, पण शास्त्रीय किंवा तांत्रिक पद्धतीने स्पष्ट उत्तर मिळू शकत नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की आधी अंडी आली आणि नंतर कोंबडी झाली, कारण कोंबडीला अंडी दिल्याशिवाय पिल्लांची निर्मिती होऊ शकत नाही. तर काही लोक कोंबडी नसती तर अंड्यांची निमिर्तीच झाली नसती असं म्हणतात. त्यामुळे या प्रश्नावर कोणाकडेच अचूक आणि ठाम असं उत्तर नाही.