why the water tank is round in shape: पाण्यामुळे सर्व सजीव जिवंत आहेत. झाडे, पशू, पक्षी आणि इतर सर्व गोष्टींसाठी पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे पाणी हे पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. आपल्या दैनंदिन गरजांमध्ये पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावते आणि इतर अनेक गरजा पूर्ण करते. या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण टाक्यांमध्ये पाणी साठवतो. तुम्ही पाण्याची टाकी अनेकवेळा पाहिली असेल, बहुतेक टाकी घरात सर्वात उंच ठिकाणी ठेवली जाते. पण या पाण्याच्या टाक्यांचा आकार नेहमी गोलाकार का असतो? तसेच पाण्याच्या टाकीला रेषा का असतात, तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया यामागील खरं कारण…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाण्याच्या टाकीचा आकार गोल का असतो?

तुमच्या लक्षात आले असेल की ज्या सरकारी पाण्याच्या टाकीतून घरांना पाणीपुरवठा केला जातो किंवा घराच्या छतावर ठेवलेली स्वतःची टाकी असो, दोन्हीचा आकार गोल असतो. आता प्रश्न असा आहे की असे का? यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे. पाण्याच्या टाकीचा गोलाकार आकार दीर्घ कालावधीसाठी सुरक्षितपणे पाणी साठवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कारण जेव्हा जेव्हा एखाद्या खोल वस्तूमध्ये पाणी भरले जाते तेव्हा सर्व बाजूंनी जोरदार दाब येतो. त्यामुळे तो फुटण्याचा धोका वाढतो. परंतु पाण्याच्या टाकीच्या दंडगोलाकार आकारामुळे, दाब सर्व पृष्ठभागांवर सहजपणे समान रीतीने वितरीत केला जातो. शास्त्रानुसार टाकी चौकोनी असेल तर त्याच्या कोपऱ्यांवर पाण्याचा दाब जास्त असल्याने तो उघडण्याचा धोका जास्त असतो.

(हे ही वाचा : भारतात चंद्राला ‘चंदा मामा’ का म्हणतात? काका, भाऊ, बाबा असं का म्हणत नाही, माहितेय? जाणून घ्या रहस्य )

पाण्याच्या टाकीला रेषा का असतात?

पाण्याच्या टाकीचा गोल आकारच नाही तर त्यावर बनवलेल्या उंचावलेल्या पट्ट्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. अनेकांना असे वाटते की, टाकीवर बनवलेल्या या पट्ट्या डिझाइनसाठी बनवल्या जातात. पण यामागेही एक महत्त्वाचे कारण आहे. पाण्याच्या टाकीत बनवलेल्या या रेषा किंवा पट्ट्या टाकीला भक्कम बनवतात.  जेव्हा उष्णता त्याच्या शिखरावर असते, तेव्हा या पट्ट्या टाकीचे विस्तार आणि नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. यासोबतच ते पाण्याचा दाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are plastic water storage tanks usually cylindrical in shape and why are lines made pdb