ट्रेनवर असणाऱ्या या झाकणांचा उपयोग काय असतो? जाणून घ्या याचे महत्त्व | Why do train roof have cap like structure on it know its benefit of ventilation and more | Loksatta

ट्रेनवर असणाऱ्या या झाकणांचा उपयोग काय असतो? जाणून घ्या याचे महत्त्व

प्रवाशांच्या सुरक्षेशी निगडित असणारे याचे कारण जाणून घ्या

ट्रेनवर असणाऱ्या या झाकणांचा उपयोग काय असतो? जाणून घ्या याचे महत्त्व
ट्रेनवर असणाऱ्या झाकणांचा उपयोग जाणून घ्या (प्रातिनिधिक फोटो)

ट्रेनने प्रवास करताना तुम्ही बऱ्याचदा ट्रेनवर असणारी झाकणं पाहिली असतील. याचा उपयोग काय असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागचे कारण बऱ्याच जणांना माहित नसते. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी ट्रेनवर अशी झाकणं लावलेली असतात. या झाकणांचे कार्य जाणून घ्या.

ट्रेनवर असणाऱ्या झाकणांचा उपयोग
ट्रेनवर असणाऱ्या या झाकणांना ‘कॅप रुफ व्हेंटिलेटर’ म्हटले जाते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही झाकणं लावली जातात. जर ट्रेनवर ही झाकणं नसतील तर ट्रेनमध्ये आग लागण्याचा धोका वाढतो. एसी ट्रेनमध्ये खिडक्या पूर्णपणे बंद असतात. अशात गरम हवा बाहेर निघण्यास मार्ग मिळाला नाही तर आग लागण्याची शक्यता वाढते. अशावेळी ‘कॅप रुफ व्हेंटिलेटर’ म्हणजेच ट्रेंवर असणारी झाकणं ट्रेनमधील वातावरण संतुलित ठेवण्यास मदत करतात.

आणखी वाचा: पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये का असतात आडव्या रेषा? जाणून घ्या…

या झाकणांखाली पंख्याच्या पाती असतात, ज्यामुळे ट्रेनमधील गरम हवा बाहेर काढण्यास मदत होते. त्यावर असणाऱ्या झाकणांमुळे पावसाचे पाणी ट्रेनच्या आत जाण्यापासून रोखता येते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:16 IST
Next Story
खरेदी केलेला APPLE IPHONE खरा आहे की बनावट, हे कसे ओळखाल? फॉलो करा ‘या’ टीप्स