मेरी ख्रिसमसच्या ऐवजी हॅप्पी ख्रिसमस का म्हणत नाहीत? स्वतः राणी एलिझाबेथने सांगितलं होतं 'हे' मोठं कारण | Why Is It Called Merry Christmas And Not Happy Christmas England Queen Elizabeth Had Explained Big Reasons | Loksatta

मेरी ख्रिसमसच्या ऐवजी हॅप्पी ख्रिसमस का म्हणत नाहीत? स्वतः राणी एलिझाबेथने सांगितलं होतं ‘हे’ मोठं कारण

Why Is It Called Merry Christmas And Not Happy: जगभरात कोट्यवधी लोक जरी मेरी ख्रिसमस अशा शुभेच्छा देत असले तरी इंग्लंडची राणी एलिझाबेथ सर्वांना ‘हॅप्पी ख्रिसमस’ अशाच शुभेच्छा देत होत्या.

Why Is It Called Merry Christmas And Not Happy Christmas England Queen Elizabeth Had Explained Big Reasons
मेरी ख्रिसमसच्या ऐवजी हॅप्पी ख्रिसमस का म्हणत नाहीत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Why Is It Called Merry Christmas And Not Happy: मूळ पाश्चिमात्य देशातील महत्त्वाचा सण असला तरी ख्रिसमसचा उत्साह भारतातही तितकाच पाहायला मिळतो. २०२२ चा नाताळ सण आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस डे दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्त अनेक मोठ्या शहरात जबरदस्त सजावट करण्यात येते. दिल्ली, मुंबई अगदी पुण्यातही ठिकठिकाणी ख्रिसमस वाईब आतापासूनच पाहायला मिळत आहे. २४ डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मुंबईत प्रसिद्ध चर्चमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि रात्री १२ वाजल्यापासून सर्वजण एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणून शुभेच्छा देतात. अन्य सर्व सणांच्या शुभेच्छा देताना आपण हॅप्पी हा शब्द पुढे जोडतो. अगदी आपले मराठमोळे सणही यास अपवाद नाहीत पण ख्रिसमसच्या बाबत हॅप्पी ऐवजी मेरी ख्रिसमस असं का म्हंटल जातं याविषयी कधीतरी तुमच्याही मनात शंका आली असेलच.

मेरी म्हणजे काय?

मेरीचा अर्थ आनंदी, सुखी असा आहे. मेरी हा शब्द जर्मनिक आणि ब्रिटिश इंग्लिशचे एकत्रीकरण करून बनलेला शब्द आहे. मेरीचा अर्थ आणि हॅपीचा अर्थ एकच आहे. पण ख्रिसमससाठी हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरला जातो.

इंग्लंडची राणी कधीच मेरी ख्रिसमस का म्हणत नव्हती?

जगभरात कोट्यवधी लोक जरी मेरी ख्रिसमस अशा शुभेच्छा देत असले तरी इंग्लंडची राणी एलिझाबेथ सर्वांना ‘हॅप्पी ख्रिसमस’ अशाच शुभेच्छा देत होत्या. दरवर्षी, इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय युनायटेड किंगडमच्या लोकांना ख्रिसमसच्या दिवशी ‘हॅप्पी ख्रिसमस’ असे म्हणायची. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थ एकच असूनही मेरी या शब्दाचा संदर्भ हा उद्दाम व नशेत असणाऱ्यांकडून वापरला जाणारा शब्द आहे अशी राणीची मान्यता होती. हॅप्पी हा राजेशाही शब्द असून राजघराण्यातील मंडळींनी शुभेच्छा देताना हॅप्पी ख्रिसमस म्हणावे असा राणीचा आग्रह असायचा असेही संदर्भ काही ठिकाणी दिसून आले आहेत.

हॅप्पी ऐवजी मेरी असे का म्हणतात?

मेरी या शब्दाची उत्पत्ती १६ व्या शतकात झाली.पुढे १८व्या व १९व्या शतकात हा शब्द प्रचलितझाला . मेरी हा शब्द प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी प्रचलित केला होता. त्यांनी त्यांच्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या पुस्तकात मेरी हा शब्द सर्वाधिक वापरला, त्यानंतर हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरात आला.

दरम्यान, बिशप जॉन फिशर यांनी थॉमस क्रॉमवेल यांना लिहिलेल्या पत्रात “मेरी ख्रिसमस” अशा शुभेच्छा दिल्या होत्या हे पत्र लंडनमधील असून याची तारीख साधारण १५३४ मधील आहे.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2022 at 16:03 IST
Next Story
युट्यूब व्हिडीओमध्ये सबटायटल्स कसे अ‍ॅड करायचे? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स