चेन्नई आणि दक्षिण भारतातील अनेक भागांना ‘मिन्चॉग’ चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे. चेन्नईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील विमान व रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहेत. मात्र, चक्रीवादळ आल्यानंतर पाऊस का पडतो? यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Christmas in December : ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?

चक्रीवादळ आणि पावसाचा काय संबंध आहे?

चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणी कमी दाबाच्या परिस्थितीत उदभवते. जेव्हा हवा कमी दाबाच्या क्षेत्रात जमा होते तेव्हा ती वरच्या दिशेने सरकू लागते. या वरच्या दिशेने जाणाऱ्या हवेत भरपूर आर्द्रता असते; जी पावसाच्या ढगांमध्ये बदलते आणि वादळ सुरू होते.

हेही वाचा- …म्हणून टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी विमानातील लाइट्स बंद करतात; खरं कारण जाणून अचंबित व्हाल!

मुसळधार पाऊस कसा पडतो?

चक्रीवादळानंतर जमा झालेले ढग संख्येने इतके मोठे असतात की, ते वाऱ्यासह हजारो टन पाणी वाहून नेऊ शकतात. ही वादळे जिथे धडकतात त्या भागात मोठ्या प्रमाणात वादळ निर्माण होते आणि पाऊस पडतो. चक्रीवादळ पावसाचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा गरम, थंड आणि कोरडी हवा एकत्र येते तेव्हा दाबाचे क्षेत्र तयार होते.ज्यामुळे मुसळधार पाऊस पडतो.

हेही वाचा- बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे काय? चित्रपटांची कमाई नेमकी कशी मोजली जाते? जाणून घ्या 

चक्रीवादळे अनेकदा मुसळधार पावसाबरोबरच का येतात?

जेव्हा वादळ वेगाने जमिनीवर आदळते तेव्हा ढग असंतुलित होतात त्यामुळे ढग पाण्यात बदलतात आणि मुसळधार पावसाचे रूप धारण करतात. त्यामुळे चक्रीवादळ आल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू होतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why start raining after cyclone arrives know the reason dpj