भारतात चित्रपटांचा मोठा व्यवसाय आहे. दरवर्षी चित्रपट व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेत करोडो रुपयांचे योगदान देतो. दर आठवड्याला दोन-चार चित्रपट प्रदर्शित होतात, जे बॉक्स ऑफिसवर करोडोंचा व्यवसाय करतात. जेव्हा जेव्हा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा त्याचे ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन’ किती झाले हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो. नुकतेच अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकजण या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, याबाबतची चर्चा करत आहेत. तुम्हालादेखील अनेकदा एखाद्या चित्रपटाने किती कमाई केली याबाबतची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. परंतु, हे चित्रपट एकाच वेळी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतात. विविध ठिकाणी चित्रपटांनी केलेली कमाई मोजण्यासाठी कोणती यंत्रणा काम करते आणि चित्रपटाची कमाई निश्चित कशी केली जाते? याबाबतची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

कोणताही चित्रपट किती चालला याचे मोजमाप बॉक्स ऑफिसच्या कमाईवर अवलंबून असते. यासाठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचा मापदंड निश्चित करण्यात आला आहे. वितरकांना थिएटर मालकांकडून साप्ताहिक आधारावर काही परतावा दिला जातो. हे कसे घडते ते समजून घेऊया. मल्टिप्लेक्समध्ये, वितरकाला पहिल्या आठवड्यात ५० टक्के दुसऱ्या आठवड्यात ४२ टक्के, तिसऱ्या आठवड्यात ३७ टक्के आणि चौथ्या आठवड्यानंतर ३० टक्के मिळतात; तर सिंगल स्क्रीनवर पहिल्या आठवड्यापासून चित्रपट चालेपर्यंत वितरकाला सहसा ७०-९० टक्के मिळतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा- Postal Voting म्हणजे नक्की काय? याद्वारे कुणाला मतदान करता येतं? नेमकी प्रक्रिया कशी असते?

ही सर्व प्रक्रिया पुढील उदाहरणाद्वारे समजून घ्या –

समजा मल्टिप्लेक्समध्ये तिकिटाची किंमत २५० रुपये आहे आणि तो चित्रपट १०० लोकांनी पाहिला, असे १०० शो एका आठवड्यात झाले, तर आठवड्यात एकूण कमाई २५ लाखांची झाली. त्यातून ३० टक्के करमणूक कर कमी केल्यानंतर उरतात १७,५०,००० रुपये. यातील वितरकाला पहिल्या आठवड्यात ५० टक्के जातात. तर दुसऱ्या आठवड्यात ४२ टक्के जातात. त्याचप्रमाणे, उर्वरित आठवड्यातदेखील वितरकाला चित्रपट जोपर्यंत चालतो, त्याच टक्क्याने वाटा मिळतो.

आता सिंगल स्क्रीनवर तिकीट १५० रुपये आहे आणि आठवड्यात १०० शो झाले, तर एकूण १५,००,००० रुपये जमा झाले. त्यातील ३० टक्के कमी केल्यानंतर, १०,५०,००० रुपये शिल्लक राहिले. यातील ८० टक्के रक्कम वितरकाकडे जाते, त्यामुळे पहिल्या आठवड्यात वितरक ८,४०,००० रुपये कमावतो. जोपर्यंत चित्रपट चालतो, तोपर्यंत वितरकाला त्याचा वाटा मिळतो. तर निर्माता वितरक आणि थिएटर मालक यांचे चित्रपटाच्या निर्मितीमधील योगदान जाणून घेऊ.

निर्माता –

निर्माता चित्रपटाच्या निर्मितीसाठी झालेल्या सर्व खर्चासाठी पैसे पुरवतो. एखादा निर्माता चित्रपट बनवण्यासाठी जी रक्कम गुंतवतो, त्याला त्या चित्रपटाचे बजेट म्हणतात. यात कलाकारांची फी, तंत्रज्ञ, क्रू मेंबर्स, जेवण आणि निवास इत्यादींचा प्रवास खर्च समाविष्ट असतात. याशिवाय चित्रपटाच्या प्रमोशनवर झालेल्या खर्चाचाही यामध्ये समावेश असतो.

हेहीवाचा- पारंपरिक मैतेई लग्न सोहळा कसा असतो? रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांच्या विवाह सोहळ्यात दिसली मणिपुरी संस्कृतीची झलक

वितरक (Distributor) –

हा निर्माता आणि थिएटर मालक यांच्यातील दुवा असतो. निर्माता आपला चित्रपट संपूर्ण भारतातील वितरकांना विकतो. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वितरक थर्ड पार्टीमार्फत काही करार करतात.

थिएटर मालक –

वितरक या थिएटर मालकांना आगाऊ कराराच्या आधारे चित्रपट थिएटरमध्ये दाखवण्यासाठी तयार करतात. भारतात दोन प्रकारचे सिनेमा हॉल आहेत. पहिली सिंगल स्क्रीन आणि दुसरी मल्टिप्लेक्स चेन. दोन्ही प्रकारच्या थिएटर मालकांशी वितरकांचे विविध प्रकारचे करार होतात. हे करार विशेषतः चित्रपटांच्या स्क्रीनची संख्या आणि परतावा लक्षात घेऊन केले जातात. या आधारे थिएटरमधील कमाईचा कोणता भाग वितरकाकडे जाईल हे ठरविले जाते. महत्वाची बाब म्हणजे ही सर्व कमाई केवळ थिएटर मालकांकडूनच केली जाते. तर या एकूण संकलनापैकी सुमारे ३० टक्के करमणूक कर राज्य सरकारला मिळतो; तर करमणूक कर भरल्यानंतर उरलेल्या रकमेचा काही भाग करारानुसार वितरकाला परत केला जातो.

Story img Loader