राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. या निवडणुकीत हरियाणातल्या नूह मध्ये राहणाऱ्या नौक्षम चौधरींची चर्चा आहे. भरपूर जिल्ह्यातील कामा विधानसभेच्या जागेवर त्या जिंकल्या आहेत. कामा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार नौक्षम चौधरी यांनी ७८ हजार ६४६ मतं मिळवली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मुख्तियार अहमद यांचा १३ हजार ९०६ मतांनी पराभव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत नौक्षम चौधरी?

नौक्षम चौधरी २०१९ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत पुन्हाना येथील जागेवरुन लढल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. मात्र ते अपयश राजस्थानच्या भरतपूरमध्ये विजय मिळवत नौक्षम चौधरींनी धुवून काढलं. कामा हा मुस्लीमबहुल मतदार असलेला भाग आहे.

३० वर्षीय नौक्षम या हरियणातल्या नूंह जिल्ह्यात असलेल्या पैमा खेडा गावाच्या रहिवासी आहेत. लंडनमध्ये त्यांनी मास कम्युनिकेशन केलं आहे. भाजपा आमदार नौक्षम चौधरी यांनी विजयानंतर सगळ्या मतदारांचे आभार मानले आहेत. शिक्षण, वीज, रस्ते, पाणी आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन यावर काम करताना भर देईन असंही त्यांनी म्हटलं आहे.

कामा या ठिकाणी काय होती परिस्थिती?

कामा येथून १२ उमेदवार उभे होते. त्यातले आठ उमेदवार मुस्लीम होते. तर चार हिंदू होते. खरी लढत नौक्षम, मुख्तियार आणि जाहिदा यांच्यात होती. मात्र यात बाजी मारली ती नौक्षम चौधरी यांनी. एक कोटी रुपयांचं वर्षाचं पॅकेज सोडून राजकारणात आलेल्या नौक्षम चौधरी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. तसंच सोशल मीडियावरही त्या लोकप्रिय आहेत.

नौक्षम चौधरी या हरियाणात निवडणूक हरल्या होत्या. त्या नौक्षम चौधरींना भरतपूरहून भाजपाने तिकिट दिलं त्यावेळी त्यांना बाहेरुन आणलं आहे असं बोललं गेलं. मात्र या विजयाने सगळ्यांची तोंडं बंद झाली आहेत. जाहिदा खान यांच्याविरोधात मुस्लिम समुदायात नाराजी होती त्यामुळे मुस्लिम समुदायाने अपक्ष म्हणून मुख्त्यार अहमद यांना उमेदवारी दिली होती. या दोघांमध्ये मत विभाजन झालं ज्याचा फायदा नौक्षम चौधरी यांना झाला. भाजपाला ही जागा जिंकणं कठीण वाटत होतं, मात्र नौक्षम चौधरी यांनी ही जागा भाजपाला जिंकून दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan assembly elections 2023 know who is nauksham choudhary who won the election on bjp ticket in kama bharatpur scj