रशियाने आपल्या अधिकाऱ्यांना १ सप्टेंबरपर्यंत मॅक्स अ‍ॅप वापरण्याचे आदेश दिले आहेत. रशिया अलीकडच्या काळात मॉस्को टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि यूट्यूबसारख्या परदेशी अ‍ॅप्सचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या मेटाला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे.

रशिया व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अधिकाऱ्यांना मॅक्स नावाने विकसित होत असलेल्या रशियन अ‍ॅप वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नेमकं काय कारण आहे आणि हे मॅक्स अ‍ॅप काय आहे हे जाणून घेऊ…

काय आहे नेमकं प्रकरण?

रशिया टेलिग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या परदेशी अ‍ॅप्सचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियामध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आधीच बंदी आहे. रशियाने २०२४ मध्ये व्हायबर मेसेंजर ब्लॉक केले. युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या मेटाला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले. मॉस्को आता व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे, जे दररोज सुमारे ६८ टक्के रशियन लोक वापरतात. जूनमध्ये पुतिन यांनी राज्य-प्रायोजित संदेशवाहक विकसित करणे अनिवार्य करणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली.

मॅक्स अ‍ॅपची रचना सरकारी व्हीके कंपनीने केली आहे, जी यूट्यूबच्या प्रतिस्पर्धी व्हीके व्हिडीओची मालकी आहे. व्हीके कंपनीची स्थापना टेलिग्रामचे निर्माते पावेल दुरोव यांनी केली होती. रशियावर निर्बंध लादणाऱ्या राष्ट्रांमधून अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचीही या कायद्यात मागणी आहे. त्याने रशियन अधिकाऱ्यांना मॅक्सकडे वळण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

रशियामध्ये सेवा बंद करण्यास अधिकारी आता व्हॉट्सअ‍ॅपला सांगत आहेत. रशियाच्या डिजिटल जागेत अशा सेवांची उपस्थिती ही खरं तर राष्ट्रीय सुरक्षेचे कायदेशीर उल्लंघन आहे, असे स्टेट ड्यूमा आयटी कमिटीचे सदस्य अँटोन नेमकिन यांनी म्हटले.

या आठवड्यात क्रेमलिनने पुतिन यांच्या सूचनांची यादी प्रकाशित केली. त्यामध्ये रशियाविरुद्ध निर्बंध लादणाऱ्या देशांमध्ये उत्पादित केलेल्या संप्रेषण सेवांसह सॉफ्टवेअरच्या रशियामध्ये वापरावर अतिरिक्त निर्बंध लागू करण्याचा आदेश समाविष्ट आहे.

‘मॅक्स’ अ‍ॅपचे वैशिष्ट्ये

  • इंस्टंट मेसेजिंग, कॉलिंग, मीडिया शेअरिंग यांसारख्या सुविधा.
  • सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये वापरण्यावर भर.
  • शियन सुरक्षा निकषांचे पालन करणारे अ‍ॅप.

मॅक्स अ‍ॅप काय आहे?

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपसारखेच आहे. मात्र, त्यात खूप फरक आहे. मॅक्स अ‍ॅप वापरकर्त्यांचा मायक्रोफोन, कॅमेरा, संपर्क, भौगोलिक स्थान आणि फाइल्सवर पूर्ण नियंत्रण ठेवते असे म्हटले जाते. ते मानक मार्गांनी बंद होत नाही, तर रूट अ‍ॅक्सेस आणि सिस्टिम फाइल्स वापरते. ते रशियन अधिकाऱ्यांद्वारे नियंत्रित असलेल्या त्याच्या मूळ कंपनीलादेखील डेटा स्वयंचलितपणे पाठवते.

प्रावडा डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी आधीच केंद्रीकृत डिजिटल ट्रॅकिंग सिस्टिमचा एक नवीन घटक तयार केला आहे, तो म्हणजे व्हीकेकडून मेसेजिंग अ‍ॅप मॅक्स. सर्व अधिकाऱ्यांना मॅक्स अ‍ॅपवर स्विच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अ‍ॅप्लिकेशनला मायक्रोफोन, कॅमेरा, संपर्क, भौगोलिक स्थान आणि फाइल्समध्ये पूर्ण प्रवेश आहे. मानक मार्गांनी ते बंद होत नाही. डेटा स्वयंचलितपणे व्हीकेशी जोडलेल्या सर्व्हरवर प्रसारित केला जातो, जो रशियन फेडरेशनच्या गुप्त सेवांच्या नियंत्रणाखाली आहे.

रशिया त्यांच्या नागरिकांच्या जीवनावरची पकड आणखी घट्ट करू पाहत आहे असे अनेकांना वाटत आहे. काहींना अशी भीती आहे की, अधिकारी लोकांना मॅक्सवर स्विच करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवेशात अडथळा आणू शकतात. रशियाने याआधी हे केलेले आहे. रशियाने डाउनलोड वेग कमी केल्यानंतर यूट्यूबच्या प्रेक्षकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. २०२४ च्या मध्यात दररोज ४ कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते असलेले आता १ कोटींपेक्षाही कमी झाले आहेत.

रशियाची भूमिका

  • रशिया श्चिमी टेक कंपन्यांवर अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • डिजिटल सार्वभौमत्व हे धोरण केंद्रस्थानी.
  • अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांकडून माहितीची गुप्तता, प्रचार व हस्तक्षेपाचा धोका असल्याची रशियाची भूमिका.

संसदेत माहिती तंत्रज्ञान समितीचे उपप्रमुख अँटोन गोरेक्लिन यांनी टेलिग्रामवरील एका निवेदनात म्हटले आहे की, जर व्हॉट्सअ‍ॅप निघून गेले तर हे नवीन अ‍ॅप बाजारपेठेतील हिस्सा मिळवू शकेल. “व्हॉट्सअ‍ॅपने रशियन बाजारपेठ सोडण्याची तयारी करण्याची वेळ आली आहे”, असे गोरेक्लिन यांनी म्हटले. रशियन सिनेटर आर्टेम शेखिन यांनी गेल्यावर्षी म्हटले होते की, जर मॉस्कोने रशियन कायद्यांचे पालन करण्यास नकार दिला तर ते अ‍ॅप ब्लॉक करू शकते. महत्त्वाचे म्हणजे, टेलिग्रामदेखील अधिकाऱ्यांच्या नजरेखाली आहे. हे अ‍ॅप रशियन उद्योजक पावेल आणि निकोलाई यांनी तयार केले आहे. यामध्ये डिफॉल्ट एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नसले तरी ते त्याच्या गुप्त चॅट्ससाठी ओळखले जाते, जे वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीचे रक्षण करू शकते