Premium

स्वामित्व हक्क उल्लंघन म्हणजे काय? ह्यूमन्स ऑफ बॉम्बे वि. पिपल ऑफ इंडिया या इन्स्टाग्राम हँडलचा वाद काय?

इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘पिपल ऑफ इंडिया’ या कंपनीला आपल्या मजकुराची नक्कल करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी केली.

Humans Of Bombay vs People of India Lawsuit
ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या इन्स्टाग्राम हँडलने पिपल ऑफ इंडिया या हँडलवर स्वामित्व हक्काचा खटला दाखल केला आहे. (Photo – Karishma Mehta and Drishti Saxena Instragram)

स्वामित्व हक्काचे उल्लंघन झाल्याबद्दल ह्यूमन्स ऑफ बॉम्बे (HOB) या इन्स्टाग्राम हँडलने पिपल ऑफ इंडिया (POI) या इन्स्टाग्राम हँडलविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी पिपल ऑफ इंडिया हँडलला समन्स बजावले आहे. एचओबी हँडलवरून ज्या पद्धतीने सामान्य लोकांच्या कथा सांगितल्या जातात, त्याच प्रकारचे सादरीकरण पीओआय हँडलवरून केले जात आहे, असा आरोप एचओबीने केला. एचओबी या इन्स्टाग्राम हँडलला २७ लाख फॉलोअर्स आहेत, तर पीओआय हँडलचे १५ लाख फॉलोअर्स आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ह्यूमन्स ऑफ बॉम्बे (HOB) कडून ज्या पद्धतीने कथा सांगितल्या जातात, त्याचे मोठ्या प्रमाणात अनुकरण किंवा नक्कल पीओआयकडून केली जात आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले. दोन्ही हँडलवर फोटोंचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचे साधर्म्य आढळल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांच्या एकलपीठाने पीओआयला समन्स बजावून ११ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील वैशिष्ट्य असे की, यामध्ये स्वामित्व हक्काचे उल्लंघन (copyright infringement) आणि सादरीकरणाचे अनुकरण (passing off) या दोन्ही बाबी समाविष्ट आहेत. पासिंग ऑफ ही युकेमधील कायद्याची संकल्पना आहे. ट्रेडमार्क, चिन्ह आणि नाव याची नक्कल करण्याबाबतचा हा कायदा आहे. स्वामित्व हक्क उल्लंघनाच्या बाबत कायदे काय सांगतात? याबाबत माहिती घेऊ.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Humans of bombay vs people of india what is copyright infringement and when does it apply kvg

First published on: 27-09-2023 at 17:18 IST
Next Story
भारतीय इतिहास आणि संस्कृती सांगणाऱ्या पुरातत्त्वीय स्थळांचे भविष्य काय? भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (एएसआय) कार्यप्रणालीवर का निर्माण झाली आहेत प्रश्नचिन्हे?