विश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा? वाचा... | Loksatta Explained on Fast melting Arctic ice turning the ocean acidic | Loksatta

विश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा? वाचा…

आर्क्टिक महासागराच्या पश्चिम भागातील आम्लपणा इतरत्र महासागराच्या पाण्यापेक्षा तीन ते चारपट वेगाने वाढते आहे, असं मत संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे.

विश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा? वाचा…
समुद्राच्या पाण्याचं आम्लीकरण

आर्क्टिक महासागराच्या पश्चिम भागातील आम्लपणा इतरत्र महासागराच्या पाण्यापेक्षा तीन ते चारपट वेगाने वाढते आहे, असं मत संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे बर्फ वितळण्याचा वेग आणि महासागरातील आम्लीकरणाचा दर यांच्यात जवळचा संबंध असल्याचंही समोर आलंय. हा अहवाल अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या ‘सायन्स’ या जर्नलमध्ये गुरुवारी (२९ सप्टेंबर) प्रकाशित झाला. आर्क्टिक महासागराच्या आम्लीकरणाची १९९४ ते २०२० दरम्यानची आकडेवारी असलेला हा पहिला अहवाल आहे.

२०५० पर्यंत वाढत जाणाऱ्या तापमानात आर्क्टिक समुद्रातील बर्फ टिकू शकणार नाही. दुसरीकडे हा बर्फ वितळल्यामुळे महासागर आणखी आम्लयुक्त होईल आणि समुद्रातील जीवसृष्टी धोक्यात येईल, असं संशोधकांचं मत आहे. महासागरातील सजीवांना होणाऱ्या धोक्याचं उदाहरण म्हणजे खेकडे. खेकडे महासागराच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार केलेल्या कवचात राहतात. ध्रुवीय अस्वल अन्नासाठी निरोगी माशांवर अवलंबून असतात. मासे आणि समुद्री पक्षी ‘प्लँक्टन’ आणि वनस्पतींवर अवलंबून असतात आणि मासे हा माणसाच्या आहाराचा मुख्य घटक आहे.

समुद्राचे पाणी साधारणपणे आम्लयुक्त असते आणि त्यातील क्षारांचं प्रमाण (pH) जवळपास ८.१ असते. वेगाने समुद्राच्या पाण्यातील आम्लकरणाच्या बदलाबाबत अनेक संशोधकांनी याआधीही इशारा दिला आहे. ही प्रक्रिया तीन मार्गांनी पृष्ठभागावरील पाणीही बदलते.

पहिला भाग म्हणजे समुद्रातील बर्फाखालील पाण्यात कार्बन डायऑक्साइडची कमतरता असते. मात्र, बर्फ वितळल्याने वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या संपर्कात येऊन या पाण्यातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. बर्फ विरघळून झालेलं पाणी पृष्ठभागावरील पाण्यात मिसळतं आणि खोल पाण्याच्या तुलनेत हलकं होतं. त्यामुळेच पृष्ठभागावरील पाणी आणि खोलातील पाणी मिसळलं जात नाही. यातून पृष्ठभागावरील पाण्यात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं.

हेही वाचा : विश्लेषण : का घटू लागल्यात पक्ष्यांच्या प्रजाती?

बर्फाचं पाणी समुद्राच्या पाण्यातील कार्बोनेट आयनचं प्रमाण कमी करतं. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर बायकार्बोनेटमध्ये करण्याची क्षमता कमी होते. याचमुळे समुद्राच्या पाण्यातील पीएच वेगाने कमी होतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका नेमकी काय? मध्यममार्गी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फायदा की तोटा?

संबंधित बातम्या

विश्लेषण : रॉय दाम्पत्याचे काय चुकले? 
विश्लेषण: कोरे कागद घेऊन हजारो चिनी नागरिक रस्त्यावर का उतरत आहेत? A4 Revolution आंदोलनं कशामुळे सुरु झाली?
विश्लेषण : ४ लाखांत खरेदी ७ हजार कोटींमध्ये विक्री, ‘बिसलरी’ कंपनीचा इतिहास काय? विकण्याचा निर्णय का घेतला?
विश्लेषण : विजय देवरकोंडाच्या चित्रपटाला परदेशातून अवैधरित्या फंडिंग? ED नं १२ तास केली चौकशी, काय आहे हे प्रकरण?
विश्लेषण: कापसाला गेल्‍या वर्षीइतके दर मिळतील का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत