मुंबईत १३ मे रोजी वादळी वार्‍यांसह पाऊस पडला. मुंबईच्या अनेक भागांमध्ये धुळीचे वादळ आले. याच वादळामुळे मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक भव्य होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत १६ जणांनी आपले प्राण गमावले; तर ७५ हून अधिक लोक जखमी झाले. होर्डिंग कोसळून लोकांचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाही. याधीही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरांमध्ये येणारी धुळीची वादळे, वादळी पाऊस, गारपीट व अतिवृष्टी यांना धोकादायक हवामान दुर्घटना म्हणूनही ओळखले जाते. परंतु, यांसारख्या दुर्घटनांसाठी स्थानिक प्रशासन संस्था मोठ्या आपत्तींप्रमाणे योजना आखत नाहीत. मुंबईतील या ताज्या दुर्घटनेने शहरी हवामानाच्या दुर्घटनांचे मानवी जीवन आणि मालमत्तेवर, विशेषत: दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये होणारे गंभीर परिणाम अधोरेखित केले आहेत. अशा दुर्घटना आणि त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांवर एक नजर टाकू या.

हेही वाचा : चार धाम यात्रेत ५ दिवसांत ११ भाविकांचा मृत्यू; नक्की काय घडतंय? यात्रेकरूंसाठी जारी करण्यात आलेले नवीन नियम काय आहेत?

मुंबईत ही दुर्घटना नक्की कशी घडली?

१३ मे रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत मुंबईत मान्सूनपूर्व वादळ आले. शहराच्या अनेक भागांत धुळीचे वादळ आले आणि त्यानंतर शहरी व उपनगरी भागांत पावसाने हजेरी लावली. या वादळात वाऱ्याचा वेग ४० किमी प्रतितास ते ९० किमी प्रतितास इतका होता. शहरातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या वेगाने वारे वाहत होते. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांताक्रूझमध्ये ८७ किमी ताशी आणि कुलाबामध्ये ५१ किमी ताशी वाऱ्याचा वेग नोंदवला गेला.

घाटकोपर (पूर्व) परिसरामध्ये १२०×१२० फूट आकारमानाचा फलक कोसळला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

वाऱ्यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आणि अनेक भागांत बॅनर्स, होर्डिंग्ज आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाडे पडली. याच वादळामुळे घाटकोपर (पूर्व) परिसरामध्ये १२०×१२० फूट आकारमानाचा फलकही कोसळला. परिणामी त्यात १४ लोकांनी आपला जीव गमावला.

गडगडाटी वादळ कसे विकसित होते? या वादळाची तीव्रता वाढत आहे का?

गडगडाटी वादळे आणि धुळीची वादळे या हवामानातील नैसर्गिक घटना आहेत. ही वादळे उन्हाळ्यात आणि मान्सूनपूर्व कालावधीत तयार होतात. तापमान वाढल्यावर हवा हलकी होते, हवेच्या दाबामधील फरक वाढतो आणि वेगाने वारे वाहू लागतात. त्यानंतर वादळे निर्माण होतात. “गडगडाटी वादळे मेसोस्केल म्हणजेच छोटी असतात. परंतु, वेगाने वाहणारे वारे यात मिसळल्यास त्यांचे स्वरूप बदलते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. धुळीच्या वादळांमुळेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. दुपारनंतर आणि संध्याकाळी गडगडाटी वादळे तयार होतात. या स्वरूपाचे वादळ फार काळ राहत नाही,” असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीव नायर यांनी सांगितले.

जागतिक तापमानवाढीमुळे भारतासह इतर देशांमध्येही तीव्र स्वरूपाची गडगडाटी वादळे सातत्याने तयार होत आहेत. उष्ण तापमानात वातावरणात पाण्याची वाफ अधिक प्रमाणात असते आणि त्यामुळे ही वादळे तयार होतात, असेही नायर म्हणाले.

मुंबईच्या भारतीय हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले, “आयएमडीद्वारे वादळ आणि मुसळधार पावसाच्या सरी यांसारख्या हवामानाच्या घटनांचा पूर्वअंदाज दिला जातो. आम्ही या नैसर्गिक घटनांचा पूर्वअंदाज जारी करतो. आम्ही शहराच्या आपत्ती विभाग, विमानतळ व रेल्वे विभागालादेखील या अंदाजाची माहिती देतो; जेणेकरून त्यांना आवश्यक ती पावले उचलता येतील.”

हवामान आणि हवामानाशी संबंधित धोके काय आहेत?

मानवी जीवन, मालमत्ता व प्राणी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या हवामानविषयक घटनांचे वर्गीकरण केले जाते. २०२२ मध्ये आयएमडीने हवामानाशी संबंधित धोक्यांमध्ये अशा १३ धोक्यांची नोंद केली. त्यांत धुळीची वादळे, गडगडाट, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, धुके, विजा, हिमवर्षाव, उष्णतेची लाट, शीतलहरी आणि वेगाने वाहणार्‍या वार्‍यांचा समावेश आहे. या दुर्घटनांचे बहु-धोकादायक म्हणून वर्गीकरण केले जाते. कारण- या दुर्घटना मृत्यू, मालमत्तेचे नुकसान, धन मानल्या गेलेल्या पशूंचा मृत्यू, पिकांचे नुकसान, तसेच पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रमाणातील नुकसानास कारणीभूत ठरतात.

वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटमधील शहरी विकास कार्यक्रम प्रमुख लुबैना रंगवाला यांनी सांगितले की, मुंबईमध्ये घडलेल्या दुर्घटनेने हे अधोरेखित होते की, मोठ्या शहरांमध्ये हवामानासाठी अनुकूल अशा पायाभूत सुविधांची गरज आहे. रंगवाला म्हणाले की, मुंबईत शहरी पूर परिस्थितीवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, शहर समुद्रकिनारी असल्याने इथे इतरही नैसर्गिक संकटे उदभवतात. “अशा संकटांना तोंड देण्यासाठी पायाभूत सुविधांचे हवामान-प्रूफिंग आवश्यक आहे. होर्डिंगच्या अपघाताने हे दिसून आले की, ते वाऱ्याचा वेग सहन करण्यास सक्षम नव्हते. त्यामुळे गजबजलेल्या शहरात अशा वस्तू असूच नयेत; ज्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात. अधिकाऱ्यांनी या प्रकारच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

अशा घटनांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो?

२०२२ मधील भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) अहवालात असे दिसून आले आहे की, २०२१ मध्ये वीज, उष्माघात, थंडी, पूर, भूस्खलन व मुसळधार पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारतात ८,०६० अपघाती मृत्यू झाले. त्यात विजेच्या झटक्याने मुळे सर्वाधिक मृत्यू झाले.

हेही वाचा : हिंसाचारामुळे धगधगत्या फ्रान्समध्ये पुन्हा दंगली भडकल्या; फ्रान्सच्या न्यू कॅलेडोनियामध्ये आणीबाणी लागू, कारण काय?

नैसर्गिक दुर्घटनांमुळे झालेल्या ८,००० पेक्षा जास्त मृत्यूंपैकी ३५.८ टक्के मृत्यू विजेमुळे झाले. विजेच्या झटक्याने २,८८७ लोकांचा मृत्यू झाला. पुरामुळे ५४७ लोकांचा मृत्यू झाला, भूस्खलनाने २६९ लोकांनी आपला जीव गमावला, थंडीमुळे ७२० लोकांचा मृत्यू झाला आणि उष्माघाताने ७३० लोकांचा मृत्यू झाला. विविध नैसर्गिक दुर्घटनांमुळे जे मृत्युमुखी गेले; त्यामध्ये विजेच्या झटक्याने २,८८७, पुरामुळे ५४७, भूस्खलनाने २६९, थंडीमुळे ७२०, तर उष्माघाताने ७३० लोकांचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multi hazard weather events mumbai billboard rac