विश्लेषण : अमेरिकन गुप्तहेर संस्थांचं बिंग फोडणारा, रशियन नागरिकत्व मिळालेला एडवर्ड स्नोडेन आहे तरी कोण? जाणून घ्या | who is edward snowden and why he got the russian citizenship is he hero or traitor for america | Loksatta

विश्लेषण : अमेरिकन गुप्तहेर संस्थांचं बिंग फोडणारा, रशियन नागरिकत्व मिळालेला एडवर्ड स्नोडेन आहे तरी कोण? जाणून घ्या

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्नोडेनला रशियन नागरिकत्व देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

विश्लेषण : अमेरिकन गुप्तहेर संस्थांचं बिंग फोडणारा, रशियन नागरिकत्व मिळालेला एडवर्ड स्नोडेन आहे तरी कोण? जाणून घ्या
एडवर्ड स्नोडेन | edward snowden

वॉशिंग्टनच्या एका छोट्याश्या शहरात लहानाचा मोठा झालेला एडवर्ड जोसेफ स्नोडेन या तरुणाने एकेकाळी साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याला कारणही तितकंच गंभीर आणि चिंताजनक होतं. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांमागचा एक भयावह चेहेरा लोकांसमोर आणणाऱ्या या तरुणाने महासत्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचं चांगलंच धाबं दणाणून सोडलं होतं. या स्नोडेनबद्दल आणि त्यांच्या थरारक जीवनप्रवासाबद्दल आपण विस्तृतपणे माहिती घेणार आहोत.

एका सामान्य अमेरिकन कुटुंबात वाढलेल्या स्नोडेनने २००४ मध्ये सैन्यात प्रवेश मिळवला. त्याचे आई वडीलही अशाच सरकारी विभागात कार्यरत होते. अमेरिकी सैन्याच्या स्पेशल फोर्समध्ये त्याला प्रवेश मिळाला परंतु ४ महिन्यातच प्रशिक्षणादरम्यान त्याच्या दोन्ही पायाला दुखापत झाल्याने त्याने सैन्यातून काढता पाय घेतला. त्यानंतर टो अमेरिकेची गुप्तहेर संघटना ‘सीआयए’च्या माहिती तंत्रज्ञान विभागात कामाला लागला. प्रोग्रामिंगमधलं ज्ञान आणि इंटरनेटची सखोल माहिती यामुळे स्नोडेनने चांगलीच प्रगती केली. त्यानंतर नॅशनल सेक्युरीटी एजन्सिचा कंत्राटदार म्हणून काम करताना स्नोडेनला सामान्य अमेरिकन नागरिकांच्या इंटरनेट वापराची सगळी माहिती तपासण्याचं काम देण्यात आलं.

आणखी वाचा : विश्लेषण : चित्रपट ‘समीक्षण’ आणि ‘टीका’ यामध्ये नेमका फरक काय? आजच्या काळातलं त्याचं महत्त्व जाणून घ्या

हे काम करताना त्याच्या हाती फार संवेदनशील आणि गुप्त अशी माहिती आणि कागदपत्रं लागली. त्यामध्ये इतकी स्फोटक माहिती होती की त्यातील एकही शब्द तो त्याच्या प्रेयसीशीही शेअर करायचं धाडस करू शकत नव्हता. एका मुलाखतीत स्नोडेन म्हणाला, “मी माझ्या प्रेयसीला सांगू शकत नव्हतो की तिची सगळी माहिती गुप्तपद्धतीने सरकार गोळा करत आहे, केवळ तीचीच नव्हे तर सगळ्यांची खासगी, गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. एकाअर्थी सगळ्या नगरिकांवर पाळत ठेवण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे. वेळ पडल्यास तीच माहिती तुमच्याविरोधातही वापरली जाऊ शकत होती.”

ही सगळी माहिती मिळवून स्नोडेनने खाजगी आणि राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला. त्याच्या म्हणण्यानुसार युरोपियन सरकार आणि इतर देशातील अनेक संघटनांच्या सहकार्याने ‘एनएसए’सारखी संस्था नागरिकांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवत आहे. आणि हा फक्त एक नाही तर जगभरात असे बरेच प्रोग्राम सरू आहेत आणि त्यात एनएसएस सामील आहे. जेव्हा स्नोडेनने ही माहिती लोकांसमोर आणली तेव्हा तो स्वतः अमेरिकेच्या बाहेर रशियात पोहोचला होता. तेव्हापासून, स्नोडेनवर अमेरिकन सरकारने सरकारी मालमत्तेची चोरी, राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत महितीशी छेडछाड आणि ती माहिती अनधिकृत संस्थांना पुरवायचा आरोप लावला होता. आजही स्नोडेनकडे अमेरिका देशद्रोही म्हणूनच बघते.

आणखी वाचा : विश्लेषण : एकेकाळच्या दुष्काळग्रस्त अशा या गावात आज राहतात ६० करोडपती शेतकरी; जाणून घ्या यामागील रहस्य

अमेरिकन सरकार आणि त्यांच्या गुप्तहेर संघटनांचं बिंग फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेनला नुकतंच रशियाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्नोडेनला रशियन नागरिकत्व देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रशियात आश्रय घेतलेल्या स्नोडेनला रशियन नागरिकाचा दर्जा मिळाला आहे. हेरगिरी केल्याप्रकरणी स्नोडेन यांच्यावर अमेरिकन सरकारने देशद्रोहाचा दाखल केला आहे. या फौजदारी खटल्याला सामोरं जाण्यासाठी स्नोडेनला अमेरिकेच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणी अमेरिकन अधिकारी अनेक वर्षांपासून करत होते. एकंदरच अमेरिका आणि रशिया यांच्यातले बिघडलेले संबंध आणि ढवळून निघालेलं आंतरराष्ट्रीय राजकारण पाहता रशिया स्नोडेनला कधीच अमेरिकेच्या ताब्यात देणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : मोबाईलच्या IMEI क्रमांकाची सरकारकडे नोंदणी करणे का आहे आवश्यक? जाणून घ्या सविस्तर माहिती

संबंधित बातम्या

विश्लेषण: ‘इस्रो’मधील गुप्तहेर प्रकरण नेमकं काय आहे? वैज्ञानिक नंबी नारायणन यांचा या प्रकरणाशी काय संबंध होता?
विश्लेषण : शाहरुख खानने मक्केमध्ये जाऊन केलेला ‘उमराह’ काय आहे? उमराह आणि हजमध्ये काय फरक?
समजून घ्या : २१ जून रोजीच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन?
पुराच्या पाण्यात गाडी अडकल्यास काय करावं?; अशा पद्धतीने वाचवू शकतो जीव
समजून घ्या: केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का?; कशी असते प्रकिया?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
“त्याच्या चाळीतल्या…” समीर चौगुलेंनी दत्तू मोरेच्या चाळीबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
“माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट