Ganeshotsav 2024 : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कुठे गणपतीचे डेकोरेशन सुरू आहे, तर कुठेग गोड पदार्थ तयार करणे सुरू आहे. कुठे नृत्याची तालीम सुरू आहे तर कुठे ढोल ताशाची तालीम सुरू आहे. गणेशोत्सवात घर कसं सजवायचं, कोणते कपडे परिधान करायचे, एवढंच काय तर बाप्पााच्या नैवद्यासाठी कोणत्या दिवशी कोणता पदार्थ बनवायचा, याची जोरदार प्लॅनिंग सुरू आहे पण तुम्ही यंदा गणेशोत्सवात गणपतीची रांगोळी कशी काढणार आहात का? होय, गणपतीची रांगोळी.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गणपतीची रांगोळी कशी काढायची याविषयी सांगितले आहे. अगदी सोप्या पद्धतीने फक्त दोन रंगाच्या रांगोळीचा वापर करून ही सोपी गणपतीची रांगोळी काढण्यात आली आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (ganeshotsav 2024 how to make ganpati rangoli in just five minuts easy ganpati design rangoli ganesh rangoli tips)
फक्त पाच मिनिटांमध्ये काढा गणपतीची सुंदर रांगोळी (how to make ganpati rangoli in just five minuts )
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चौकोनी आकारात पिवळा रंग फरशीवर टाकलेला आहे. त्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने बोटाने त्यावर गणपती काढतात. फक्त काही सेकंदात एक बोटाने गणपती काढतात. त्यानंतर या चौकोनाच्या भोवती गुलाबी रंगाची बॉर्डर देतात आणि या बॉर्डरवर सुद्धा सुंदर सोपी अशी बोटाने डिझाइन काढतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही सुंदर गणपतीची रांगोळी अगदी पाच मिनिटांमध्ये काढता येते. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात ही रांगोळी तुम्ही काढू शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
rangoli_nation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गणेशा रांगोली, गणपती बाप्पा मोरया” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, “गणपती बाप्पा मोरया” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान रांगोळी” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.