महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षे(बारावी)च्या प्रवेशपत्र मंगळवार,  ४फेब्रुवारी रोजी वितरीत करण्यात येणार आहे. याआधी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मंडळातर्फे  दहावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व यादी शाळांना वितरीत केली जाणार आहे. बारावीच्या मौखिक, प्रात्यक्षिक, प्रकल्प, पर्यावरण गुणतक्ते आदींचे साहित्यही यावेळी शाळांना दिले जाणार आहे. बारावीच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ३ फेब्रुवारी रोजी दिले जाणार आहे. हे साहित्य सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात दिले जाणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. यानंतर विद्यार्थ्यांना शाळांमधून प्रवेशपत्रांचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान प्रवेशपत्रांचे वाटप करण्यासही उशीर झाला आहे. यामुळे मौखिक परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार असल्याचे काही शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर नमूद केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc students examination hall tickets to be distributed on monday