महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असून यासाठी http://www.mahahsscboard.maharashtra.go या संकेतस्थळावर शाळांनी लॉगइन करावे, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शाळांच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी असेही मंडळाने नमूद केले आहे.
अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
*१० ते २० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्क भरून ऑनलाइन अर्ज सादर करावा.
*२१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.
*शाळांनी नियमित शुल्काची रक्कम २१ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत बँकेत जमा करावी. विलंब शुल्काची रक्कम २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबपर्यंत बँकेत भरावी.
*नियमित शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी २८ नोव्हेंबर रोजी, तर विलंब शुल्कासह अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी ५ डिसेंबर रोजी सादर करावी.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2014 रोजी प्रकाशित
दहावी परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर
शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

First published on: 08-11-2014 at 04:41 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc examination applications