कोल्हापूर- येथील शाहू मिल परिसरात शनिवारी रात्री घरांना आग लागली आहे. आगीच्या मोठ्या ज्वाळा पसरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आग विझवण्यासाठी परिसरात लोकांची एकच धावाधाव झाली.परिसरात फटाक्याची दुकाने असून त्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
फटाका नियंत्रित करण्याच्या बाबींकडे दुर्लक्ष झाले असल्याची माहिती पुढे येत आहे. आगीत मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.आग लागल्याची माहिती मिळताच चार अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परिसरातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनीही आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला आहे.
हेही वाचा >>>पालकमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यातील मतभेद पुन्हा ताणले
शाहू परिसरात घरांना लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच लोकांची गर्दी जमा झाली. घरांच्या बाजूला असलेल्या फटाक्यांची दुकाने असल्याने मोठा भडका उडण्याची भीती अनेक जण व्यक्त करत होते. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते.