शेतक ऱ्यांच्या आंदोलनापुढे नमते घेत सरकारकडून शेतक ऱ्यांना निकषांसह सरसकट कर्जमाफीला तत्त्वत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचे कोल्हापूर शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. शेतकरी संपाला पािठबा देण्यात आघाडीवर असलेल्या सर्वपक्षीय शेतकरी संप समन्वय समितीच्यावतीने शिवाजी चौक येथे साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शेतकरी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अल्पभूधारकांना आजपासूनच कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा केली.
हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढाईचा प्रचंड विजय असल्याची प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी रविवारी व्यक्त केली. या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी शेतकरी चळवळीपुढे शासन नमल्याचा उल्लेख केला.
अल्पभूधारकांना तत्काळ कर्जमाफी, नव्या कर्जाचे सोमवारपासून वाटप, निकषांसह सरसकट कर्जमाफीला तत्त्वत मंजुरी, निकष ठरविण्यासाठी सरकार आणि शेतकरी नेत्यांची समिती नियुक्त करण्याच्या निर्णयाबद्दल शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, माकप, भाकप आदी संघटनांचे कार्यकत्रे यात सहभागी झाले होते. शेतकरी आंदोलन तुर्तास तरी मागे घेतले आहे. मात्र, २६ जुलपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.
भाजपकडून थंडे स्वागत
एरवी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विकासकामाबाबत एखादा निर्णय घेतला की त्याचे स्वागत करण्यासाठी भाजपमध्ये अहमहमिका लागलेली असते. पण आज मंत्री पाटील यांनी इतका महत्त्वाचा निर्णय घेऊनही भाजपने त्याचे थंडे स्वागत केले.
