कोल्हापूर : कोल्हापूर शहरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला असला तरी पुरामुळे शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. कचरा, अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने स्वच्छता मोहीम सुरू ठेवली आहे.आठवडाभर जोरदार पाऊस पडल्याने कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या भानागरी वस्तीत पाणी आल्याने लोकांना स्थलांतर करावे लागले. अनेक ठिकाणी चार ते पाच फूट पाणी आले होते. पाणी आठवडाभर तुंबून राहिल्याने एक ते दीड फूट गाळ, चिखल अनेक ठिकाणी साठला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाऊस आता कमी झाला असला तरी घराची ओढ लागलेल्या नागरिकांना चिखल, गाळ, दुर्गंधी यातून वाट काढणे मुश्किल झाले आहे. जाधववाडी, सुतारमळा, कुंभार गल्ली, सिद्धार्थनगर, लक्षतीर्थ येथील पूरग्रस्त नागरिकांनी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली आहे. कोल्हापुरात स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. संसाराचे काही साहित्य, कपडे, मुलांचे दप्तर यांची नासधूस झाली आहे. शहरात जितक्या प्रमाणामध्ये चिखल, कचरा, दुर्गंधी आहे, त्या तुलनेत हे काम मंद गतीने होत असल्याने महापालिकेच्या संथगती कामावर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to flood in kolhapur citizens are suffering due to mud waste uncleanliness stench in the city amy