कोल्हापूर : कागल तालुक्यातील दूधगंगा नदी पात्रात आज चार मानवी कवठ्या सापडल्या. सिद्धनेर्ली गावामध्ये सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या लोकांना हा प्रकार दिसला. यामुळे खळबळ उडाली असून पोलीस या प्रकाराची चौकशी करत आहेत.

कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली या गावातून दूधगंगा नदी वाहते. नदीमध्ये नदीपात्रात सकाळी वर्दळ असते. काही लोक हो पोहण्यासाठी येत असतात. काही कपडे, जनावरे धुण्यासाठी येत असतात. पोहण्यासाठी आलेल्या काही लोकांना नदीपात्रात कडेला चार कवट्या सापडल्या. नदी पाण्याची पातळी कमी झाल्याने हा प्रकार दिसून आला. ही माहिती समजल्यानंतर पोलीस पाटलांनी कागल पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस आले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे.

आणखी वाचा-Buldhana Accident : “लोक आगीत होरपळत होते, काचा फुटाव्यात म्हणून प्रयत्न करत होते, पण..” प्रवाशाने सांगितली आपबिती

एकाच वेळी चार मानवी कवट्या कशा सापडल्या, त्या येथे कोणी आणून टाकल्या, या भागात मंत्र तंत्रविद्या चालत असल्याने त्यांच्यापैकी कोणी हा प्रकार केला आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत चालले आहेत.या कवट्यांवरून गूढ वाढले आहे.